शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

corona virus : कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑफलाईन, भरती प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:47 PM

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅफलाईन करण्यात येणार आहेत़

ठळक मुद्देकोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑफलाईन, भरती प्रक्रिया सुरू ९०० प्राथमिक शिक्षकांच्या होणार बदल्या, धडे आॅनलाईन, बदल्या मात्र ऑफलाईन

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्याबदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅफलाईन करण्यात येणार आहेत़सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन, तर आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्हांतर्गत ऑफलाईन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ या बदल्या करताना ३० सप्टेंबरपर्यंत रिक्त असलेल्या पदांचा विचार करूनच आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्यात, असे शासनाचे आदेश आहेत़कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत़, असे शासनाने जाहीर केले होते़ त्यानंतर ३० जुलैपर्यंत बदल्या करण्यात याव्यात, असे आदेश शासनाने दिले होते़ त्यामध्ये बदल करुन आता या बदल्या करण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.मागील वर्षी बदल्यांमध्ये सुगम आणि दुर्गम क्षेत्रावरून वाद निर्माण झाला होता़ त्यामुळे गटबाजी निर्माण झाली होती. या बदल्यांच्या वेळी काही शिक्षक न्यायालयातही गेले होते. अखेर वादामध्ये सुमारे ३,५०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन करण्यात येणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात एकूण २,५७४ प्राथमिक शाळा आहेत़ त्यामध्ये सुमारे ६ हजार शिक्षक कार्यरत आहेत.शासनाच्या आदेशानुसार एकूण संख्येच्या १५ टक्के बदल्या करण्यात येणार आहेत़ म्हणजेच जिल्ह्यातील ९०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. या बदल्यांसह जिल्ह्यातील ३ केंद्रप्रमुख आणि २ विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. बुधवारी या बदल्या करण्यात येणार आहेत.शासनाच्या भूमिकेबद्दल आश्चर्यसध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा सुरु कराण्यात आलेल्या नाहीत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे ऑनलाईन देण्यात येत आहेत़ मात्र, शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन करण्यात येणार आहेत़, त्याबद्दल शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ तसेच या ऑफलाईन बदल्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकTransferबदलीRatnagiriरत्नागिरी