शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona in ratnagiri : जिल्हा रूग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर डोम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 7:24 PM

कोरूना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात सॅनिटायझर डोम कक्षाची उभारणी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर डोमनिर्जंतुकीकरण सुविधा, स्वॅबसाठीही संपर्कमुक्त कक्षाची निर्मिती

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सॅनिटायझर डोम आणि संपर्क मुक्त स्वॅब नमुना गोळा करणाऱ्या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सींग अतिशय महत्वाचे आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच येथील डॉक्टर नर्सेस आणि इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे.

हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ह्यसॅनिटायझर डोमह्ण उभारण्यात आला आहे.या स्वयंचलित डोमला सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. यात येणारी व्यक्ती दाखल होताच निर्जंतुकीकरण द्रावणाचा फवारा सुरू होतो, तो या दोन मीटरच्या कक्षातून बाहेर पडेपर्यंत सुरू राहतो, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे निर्जंतुकीकरण शक्य होत आहे, अशी माहिती हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते संजय वैशंपायन यांनी दिली.

निर्जंतुकीकरणासाठी साबणयुक्त पाणी पुरेसे आहे. त्याचा या डोमला अविरत पुरवठा होईल, याची पुर्णपणे खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.यासोबतच संशयित रुग्णांच्या घशाचा द्राव (स्वॅब) तपासणीसाठी ज्या ठिकाणी घेतला जातो, त्या ठिकाणी एका काचेच्या बंदिस्त केबिनबाहेर रबरी ग्लोव्हजच्या आधारे तपासणी नमुना गोळा करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणी नमुना घेतल्यानंतर लगेच जंतुनाशक फवारणी करण्यात येते. आतील बाजूस नमुना गोळा करणाऱ्या डॉक्टरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्याच्या काचा सिलिकॉने बंदिस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी