शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून महायुतीत वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:54 IST

दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन ...

दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. एका शासन अध्यादेशाचा आधार घेत भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी एकाच गावात अधिक निधी खर्च केला जात असल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र, जुन्या अध्यादेशाच्या आधारावर ते बोलत असून, नव्या अध्यादेशानुसार ते आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असा पलटवार राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आहे.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर डॉ. नातू यांनी बोट ठेवले आहे. या योजनेच्या अध्यादेशाप्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे ३ ते ५ कोटी या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. मात्र, दापोली तालुक्यातील एकाच गावामध्ये १४ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या भल्यासाठी ही कामे होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला असून, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्यांच्या या आरोपावर राज्यमंत्री कदम यांनी पलटवार केला आहे. डॉ. नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  करताना  ज्या अध्यादेशाचा उल्लेख  केला आहे, तो २०१५ या सालातील आहे. त्यात ग्रामविकास राज्यमंत्री अध्यक्ष  असा उल्लेख आहे. परंतु २०२०च्या सुधारित अध्यादेशानुसार ग्रामविकास मंत्री अध्यक्ष आहेत. त्यामुळे नातू आपल्याच मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असे राज्यमंत्री कदम यांनी म्हटले आहे.

ही योजना अनेक वर्षे रखडली होती. निधी खर्च होत नव्हता. आपण त्यासाठी पुढाकार घेतला. एकाचवेळी जास्त गावे घेतली तर कोणाच्याही वाट्याला पुरेशी रक्कम येणार नाही. त्यापेक्षा एक एक गाव विकसित करण्यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले.

निधीचा गैरवापर नाही

  • मंजूर झालेल्या १४ कोटी निधीचा कुठेही दुरुपयोग होणार नाही. मात्र, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्याअगोदर नातू यांनी आपल्याशी संवाद साधला असता तर विषय वाढला नसता.
  • पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावरील  अनेक गाव विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात नातू यांनी आडकाठी घालू नये, असा विनंतीवजा इशारा कदम यांनी दिला आहे.