शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई तब्बल दोन महिन्यांनी

By admin | Updated: August 26, 2015 22:47 IST

अवेळी पाऊस : आंबा बागायतदारांना न्याय

गुहागर : तालुक्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या आंबा नुकसानासाठी भरपाई म्हणून ३ हजार ८८६ शेतकऱ्यांसाठी आलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीमधून ६५२ शेतकऱ्यांना ९९ लाख रुपयांचा निधी वाटप केला असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.गुहागर तालुक्यात ३ हजार ८८६ सातबारे असून, त्यावर १९ हजार ५२७ शेतकऱ्यांची नावे आहेत. यासाठी हेक्टरी २५ हजार भरपाईचा निकष असून, दोन एकरपर्यंत ५० हजार एवढी कमीत कमी नुकसानभरपाई मिळणार आहे शासनाकडून आलेला निधी जूनमध्ये तालुक्याला प्राप्त झाला असला तरी हा निधी कोणत्या निकषाद्वारे वाटप करायचा, हे धोरण निश्चित नसल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर ६५२ शेतकऱ्यांना ९९ लाखांचा निधी वाटप करण्यात आला.प्राथमिक टप्प्यात सातबारा उताऱ्यावर एकमेव नाव असलेल्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात येत आहे. उर्वरित सातबारा उताऱ्यांवर एकापेक्षा जास्त नावे आहेत, तसेच यामधील अनेक व्यक्ती बाहेरगावी असल्याने हा निधी वाटप होण्यामध्ये अडचणी आहेत.याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सातबारा उताऱ्यांवरील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकाला समान निधी देण्यात येणार आहे. अन्यथा कोणा एकाला संमत्तीपत्राद्वारे मंजुरी दिल्यास त्या व्यक्तीच्या नावे निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र पूर्ण करुन निधी ताब्यात घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)