विविध कंपन्यांनी स्वत:चे कोविड सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:59+5:302021-04-24T04:31:59+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वत: यंत्रणा उभारावी तसेच बाधित कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सेंटर उभारावे. ...

Collector orders various companies to set up their own covid centers | विविध कंपन्यांनी स्वत:चे कोविड सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

विविध कंपन्यांनी स्वत:चे कोविड सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वत: यंत्रणा उभारावी तसेच बाधित कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सेंटर उभारावे. त्याचा फायदा स्थानिक लोकांनाही होईल, हे पाहावे. याची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत करावी. अन्यथा ती कंपनी बंद करण्यात येईल, असे आदेश या कंपन्यांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांना ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यातच आता लसीकरणासाठीही सर्वच केंद्रांवर गर्दी होत आहे. आरोग्य यंत्रणेसह विविध यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. नागरिकांची चाचण्यांबरोबरच लसीकरणासाठीही गर्दी होत असतानाच विविध कंपन्यांमध्ये अनेक कामगार पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्या चाचण्यांचाही भार होत आहे. काेरोना रुग्णालये, कोरोना केअर सेंटरमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे विविध कंपन्यांनी आपल्या आस्थापनांमधील बाधित कर्मचाऱ्यांसाठी स्वत: कोविड सेंटर उभारावे तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्यांसाठी स्वत: कीट उपलब्ध करून चाचण्या करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या सर्वांची नोंद जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील घरडा, विनती, फिनाेलेक्स या चार कंपन्यांनी स्वत:चे कोविड सेंटर उभारले आहे. मात्र, जे. एस. डब्ल्यू, गद्रे तसेच औद्योगिक वसाहतीतील काही बड्या कंपन्यांमधील अनेक कामगार पाॅझिटिव्ह होऊनही अद्याप या कंपन्यांनी स्वत:चे कोविड सेंटर उभारलेले नाही. तसेच शासकीय यंत्रणेवरील चाचणीचा ताण कमी करण्यासाठी या कंपन्यांनी स्वत: कीट उपलब्ध करून कामगारांच्या कोरोना चाचणी करावी. या कंपन्यांनी येत्या दोन दिवसांत स्वत:चे कोविड सेंटर न उभारल्यास कंपनी बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या कंपन्यांना दिला आहे.

Web Title: Collector orders various companies to set up their own covid centers