शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोसळलेल्या दरडीची तब्बल पंधरा दिवसांनी दखल

By admin | Updated: August 5, 2014 00:11 IST

घटनेची माहिती तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात नसल्याने अनेकांनी आश्चर्य

खेड : तालुक्यातील अठरागाव धवडे बांदरी विभागातील कांदोशी सुतारवाडी येथील दरड कोसळल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी तेथील धोकादायक परिस्थितीची तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि प्रांताधिकारी यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत येथील नायब तहसीलदारांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन कांदोशी प्रकरणाबाबत जाब विचारला. तब्बल पंधरा दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला आहे.दि. १५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या कांदोशी सुतारवाडी येथील ५०० मीटर उंचीवर असलेली दरड कोसळली होती. मातीमिश्रित असलेली ही दरड तेथील काही ग्रामस्थांच्या घरात घुसली होती़ मात्र, या घटनेची माहिती तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ही दरड कोसळल्याने तेथील ८ घरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.प्रशासनाने याकामी उपाययोजना करावी, अशी मागणीही या ग्रामस्थांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी संयुक्तरित्या तेथील दरडीची आणि धोकादायक स्थितीची पाहणी केली आहे़ याबाबत संकपाळ यांनी येथील धोकादायक असलेल्या ३ घरांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मनसे’चे विभागीय संघटक वैभव खेडेकर यांच्यासह मनसेचे उपजिल्हाप्रमुख विश्वास मुधोळे, वैजश सागवेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले, तालुकाप्रमुख शरद शिर्के तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांची भेट घेऊन प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती घेतली़ शिवाय पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’सारखे प्रकरण उद्भवू नये, याकरिता प्रशासनाने उपाययोजना करावी, असे वैभव खेडेकर यांनी सुचवले. यावेळी वाळके यांनी परिस्थितीकडे प्रशासन गंभीरतेने पाहत असून, गावातील सरपंच, पोलीसपाटील आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)