शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदाची निवड बिनविरोध

By admin | Updated: December 26, 2014 23:50 IST

चिपळूण पालिका : शिक्षण समिती निर्मला चिंगळे यांच्याकडे कायम...

चिपळूण : येथील नगरपरिषदेच्या बांधकाम, शिक्षण, आरोग्य व वैद्यकीय, नियोजन विकास, पाणी पुरवठा, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदाची आज (शुक्रवारी) घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली. बांधकाम समितीचे सभापतीपद बरकत वांगडे, शिक्षण समितीचे सभापतीपद निर्मला चिंगळे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. चिपळूण नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात विविध विषय समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम प्रांताधिकारी रवींद्र हजारे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. सकाळी ११ ते १२ या वेळेत विविध विषय समिती सदस्य निश्चित करण्यात आले. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत सभापती पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरुन घेण्यात आले. २ ते २.३० या वेळेत अर्जांची छाननी करण्यात आली. २.४५ नंतर विविध विषय समिती सभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी बरकत वांगडे, शिक्षण समितीच्या सभापतीपदी निर्मला चिंगळे, नियोजन विकास समितीच्या सभापतीपदी कबीर काद्री, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी रुक्सार अलवी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिल्पा खापरे, तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांची निवड करण्यात आली आहे. विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने नियोजित वेळेनंतर सभापतीपदांची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हजारे यांनी घोषणा केली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी यापूर्वी शिल्पा सप्रे-भारमल, वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतीपदी आदिती देशपांडे, तर पाणी पुरवठा सभापती म्हणून कबीर काद्री हे काम पाहात होते. त्यांच्या जागेवर अन्य चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. स्थायी समितीवर पदसिध्द नगराध्यक्ष व सर्व विषय समित्यांचे सभापती असून, चिपळूण विकास आघाडीतर्फे शहाबुद्दिन सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुचय रेडीज, चिपळूण शहर विकास आघाडीतर्फे मोहन मिरगल यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी आदिती देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. विविध विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. (वार्ताहर)कार्यकर्त्यांची वानवाचिपळूण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी राजकीय पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे सभापती निवड असतानाही चिपळूण पालिकेचा आवार नेहमीसारखाच भासत होता. सभापती निवडीत कोणतेही छुपे राजकारण न करता निवड प्रक्रिया पार पडल्याने लक्ष लागलेल्या या निवडीची इतिश्री झाली.