शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र करणार

By admin | Updated: November 4, 2015 23:56 IST

ग्रामीण भागात बोगस डॉक्टर्स, वैदूंचा सुळसुळाट आहे. पैशांच्या लोभापायी रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या २८ बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाकडून कारवाई कली आहे.

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात धाडसत्राची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी बोगस डॉक्टर जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या सभेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची माहिती तत्काळ गोळा करून पोलिसांच्या मदतीने कारवाईची मोहीम राबवण्याचे आदेश दिले. सध्या अ‍ॅलोपॅथी औषधांकडे रुग्णांचा कल अधिक आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद आणि इलेक्ट्रोपॅथींना अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर न करण्याची शासनाच्या आरोग्य विभागाकडून सक्त ताकीद आहे.ग्रामीण भागात बोगस डॉक्टर्स तसेच वैदूंचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. केवळ पैशांच्या लोभापायी आतापर्यंत रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या २८ बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन अनेक बोगस डॉक्टरांनी गाशा गुंडाळला होता. मात्र, आता पुन्हा बोगस डॉक्टर्सनी डोके वर काढले आहे. सध्या जिल्ह्यात २६ इलेक्ट्रोपॅथी, ७ नॅचरोपॅथी तसेच रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशनर, आयुर्वेदिक वैद्यविशारदरत्न, आयुर्वेदिक आणि सर्टिफिकेट नसलेला प्रत्येकी एक असे एकूण ३७ जण कार्यरत आहेत.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची सोमवार २ नोव्हेंबर रोजी सभा झाली. या सभेमध्ये तालुकास्तरीय समितीने बोगस डॉक्टरांबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियमित आढावा घेऊन त्याची माहिती जिल्हास्तरीय समितीला सादर करावी. तसेच नगरपंचायत व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी शहरी भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती जिल्हास्तरीय समितीला सादर करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे बोगस डॉक्टरांविरोधात धाडसत्र आयोजित करुन त्यांच्याविरोधात मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (शहर वार्ताहर)तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहेतालुकाइलेक्ट्रोपॅथीनॅचरोपॅथी मंडणगड२०दापोली५२खेड२०चिपळूण१२संगमेश्वर११रत्नागिरी११लांजा३०राजापूर१११आयुर्वेदिक वैद्यविशारदरत्न१रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशनर१सर्टिफिकेट नसलेला१आयुर्वेदिक१होमिओपॅथी, आयुर्वेद आणि इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर यांनी अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करू नये, अशी आरोग्य विभागाकडून सक्त ताकीद आहे. तरीही ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी काही बोगस डॉक्टर खेळत आहेत. त्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे.बोगस डॉक्टर जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा.बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच धाडसत्र.बोगस डॉक्टर्सकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ. अहवाल सादर करण्याचे आदेश.