शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला दात्यांच्या उत्तम प्रतिसादात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीचे भान कायम जपणाऱ्या ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित या ...

रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीचे भान कायम जपणाऱ्या ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित या पहिल्या रक्तदान शिबिरासाठी रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन आणि साखरतर येथील रहेबर फाऊंडेशन या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावर्षी कोरोनामुळे रक्ताची गरज वाढली आहे. त्यातच लोक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असल्याने नियमित होणारे रक्तदानही कमी झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘लोकमत’ने संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा तथा बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर दि. २ ते १५ जुलै यादरम्यान रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सहा शिबिरे होणार असून, पहिल्या शिबिराचा प्रारंभ शुक्रवारी झाला. यावेळी ‘लोकमत’च्या सर्व कर्मचाऱ्यांसह जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे आणि अन्य सदस्य तसेच रहेबर फाऊंडेशनचे अध्यक्ष रहेबर साखरकर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. महेश गर्दे यांच्या हस्ते डाॅ. संघमित्रा फुले यांचे स्वागत करण्यात आले. डाॅ. फुले यांनी रक्तपेढीला सहकार्य करण्यासाठी पुढे आल्याबद्दल धन्यवाद दिले.

या शिबिरात रक्तदान करणारे दाते असे : मनोज मुळ्ये, महेश गर्दे, सुधीर पाटील, बाळकृष्ण खापरे, तन्मय दाते, मल्यमा मठ, सुमित जाधव, चिनार नार्वेकर, आरिफ फणसकर, असल साखरकर, सादिक चाऊस, अल्ताफ साखरकर, सईम साखरकर, हाफिक चाऊस, प्राजक्ता चव्हाण, तेजस लिंगायत, महमद मुल्ला, सज्जाद मुकादम, आरिफ राजपूरकर, अमोल खापरे, हयात चाऊस, अमन साखरकर, इनायत साखरकर, अकुल कवळे, आशुतोष कवळे, नदीम चाऊस, संतोष बेहेरे, यतीन दामले, मानस प्रसादे, रूपेश चंवडे आणि मनोज गर्दे.

या शिबिरासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढीचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अर्जुन सुतार, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. रेखा ठाकूर, अधिपरिचारक प्रभाकर मुळेकर, वैज्ञानिक अधिकारी मानसी डोंगरकर, गाैरी सावंत, सागर चव्हाण, टेक्निकल सुपरवायझर मयुरी वारंग, कक्षसेवक सचिन फुटक, सफाईगार कृष्णा मकवाना, वाहनचालक संदीप वाडेकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

...................................

पोलीस अधीक्षक, सीईओ यांची भेट

‘लोकमत’ने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी आवर्जून भेट देत या उपक्रमाचे काैतुक केले. यापुढेही ‘लोकमत’ने हा उपक्रम सुरू ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डाॅ. गर्ग यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर हेही उपस्थित होते.

..................................

उद्या पुन्हा शिबिर

रविवार, ४ जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये पुन्हा रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना, राजरत्न प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’ने हे शिबिर आयोजित केले आहे.