शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:25 IST

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. यामध्ये एक कोटी ६२ लाख रत्नागिरी, तर ३६ लाख निधी चिपळूणच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला. उर्वरित अन्य सात तालुक्यांत एकही निधी देण्यात आला नसून, केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांसाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीमध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपली आहे.

खासदार नारायण राणे चिपळूणच्या दौऱ्यावर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात निधी वाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. खासदार राणे यांनी हा विषय सौम्य केला असला, तरी आता गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांनी पालकमंत्र्यांच्या निधी वाटपावरील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या सचिव स्तरावरून या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी नातू यांनी केली आहे.

जनावरांना तपासण्याच्या जागी पेव्हर ब्लॉक?

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २१ कामे नियोजन मंडळाने मंजूर केली. ही सर्व कामे बांधकामाची आहेत. दवाखान्याच्या बाहेरील रिकामी जागा जनावरांना तपासण्याची असते. पण त्या ठिकाणी पेव्हर ब्लाॅक बसविले जात आहेत, असा आक्षेप डॉ. नातू यांनी घेतला आहे.

चार तालुक्यांना निधीच नाही

जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन बांधकामे सुरू आहेत. यामध्ये दवाखान्याला फाॅल सिलिंग करणे हेही काम मंजूर आहे. या सर्व कामांमध्ये असे दिसून येत आहे की, ७६ लाखांची कामे रत्नागिरी तालुक्याला, ३१ लाखांची कामे राजापूरला, ४२ लाखांची कामे चिपळूण तालुक्यात, ५ लाखांची कामे संगमेश्वरात, ३ लाखांची गुहागरात, तर अन्य उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना निधीच नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे.

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका

डॉ. नातू यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून त्यांनी राज्यमंत्री कदम यांच्यावर निशाणा साधला होता. आता जिल्हा नियोजनच्या निधीवरून त्यांनी पालकमंत्री सामंत यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये फार काही आलबेल नसल्याचेच चित्र दिसत आहे.