शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मरची... ४ मेरोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
4
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
5
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
6
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
7
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
8
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
9
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
10
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
11
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
12
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
13
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
14
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
15
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
16
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
17
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
18
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
19
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
20
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

भाजप - राष्ट्रवादी हात मिळवणी

By admin | Updated: October 24, 2015 00:55 IST

देवरूख नगराध्यक्ष निवड : शिवसेनेला रोखण्यासाठी नवे डावपेच

देवरुख : देवरुख नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली आहे. यामुळे देवरुखवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. युतीमध्ये असलेल्या शिवसेनेचा हात सोडून भाजपने राष्ट्रवादीला जवळ करून सत्ता काबीज करण्याचे मनसुबे रचले आहेत. त्यामुळे नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीने वरिष्ठ पातळीवर जोरदार प्रयत्न केले आहेत.नगरपंचायतीत पहिल्या अडीच वर्षामध्ये सेना-भाजपची युती होती. या पहिल्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये पहिले सव्वा वर्ष सेनेच्या नीलम हेगशेट्ये, तर दुसरे सव्वा वर्र्ष भाजपच्या स्वाती राजवाडे यांनी पदे भूषवली होती. दरम्यान, अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पुरुषांसाठी नगराध्यक्षपदे खुले झाले. मात्र, युतीत पूर्वी ठरल्याप्रमाणे यावेळची टर्म ही शिवसेनेकडे होती. मात्र, आता या पदासाठी चक्क चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नंदादीप बोरुकर आणि प्रमोद पवार यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल भुवड आणि भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ‘वन टू का फोर’ स्थिती निर्माण झाली आहे.या सगळ्या घडामोडींचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार केला तर सध्या राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकमेकांशी संधान साधल्याचे दिसत आहे. तशी गुप्त बैठका वरिष्ठ पातळीवर झाल्याची चर्चादेखील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत. सध्याच्या पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपच्या ५ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या ५ जागा अशा १० जागा एकत्रित येण्याची दाट स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या दोन उमेदवारांपैकी एकाने अर्ज माघारी घेतल्यास त्यांच्या असलेल्या ७ जागांमध्ये केवळ दोन जागांची गरज आहे. असे असताना २४ रोजी कोण कोण अर्ज माघारी घेणार याकडे लक्ष आहे. शुक्रवारी भाजपचे ५ व राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक दुपारपासूनच गायब होते. (प्रतिनिधी)