शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बंदी उठूनही मासेमारी गाळात

By admin | Updated: August 6, 2015 23:42 IST

मच्छीमार संकटात : गाळाच्या समस्येसह वातावरणातील बदलांचा फटका

रत्नागिरी : किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मच्छिमारांना सावधानतेचा इशारा मत्स्य विभागाकडून दिला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौका किनारी नांगरावर आहेत. आधीच गाळाच्या समस्येमुळे हैराण झालेल्या मच्छीमारांना आता वातावरणातील बदलाने आणखीनच संकटात टाकले आहे.खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी उठून पाच दिवस उलटले आहेत. अजूनही समुद्र शांत झालेला नाही. सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्रामध्ये उंच लाटा उडत असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाणे अजूनही धोकादायकच आहे. तरीही काही मच्छिमार जीव मुठीत धरुन खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. जीव धोक्यात घालून मासेमारी करीत असले तरी मिळणाऱ्या कोळंबीला आवश्यक तो दर मिळत नसल्याचे मच्छिमारांमध्ये नाराजीचा सूर उमठत आहे. गेले काही दिवस शांत असलेल्या पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असून सोसाट्याचा वाराही वाहत आहे. तसेच लाटा उसळत आहेत. समुद्र किनारी भागांमध्ये कोकणात जोरदार वारे व पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सावधानतेचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर गेले दोन दिवस वातावरणामध्ये सतत बदल सुरु होते. त्यामुळे मच्छिमारही चिंतेते होते. या इशाऱ्यानंतर नौका दोन दिवस नांगरावर आहेत. (शहर वार्ताहर)६ आॅगस्ट २०१५ रोजी रात्रौ ११.३० वाजेपर्यंत मालवण ते वसई किनारपट्टी दरम्यान २.५ ते २.९ मिटर उंचीच्या लाटा उठण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह ६२ ते ६९ सें.मी. प्रती सेकंड राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि रिलायन्स फाऊंडेशनने मच्छिमारांना देण्यात आला होता. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-४१९-८८०० संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी सतत बदलत्या वातावरणामुळे मच्छिमार धोका पत्करण्यास तयार नाहीत.