शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भटाळी रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

राजापूर : शहरातील बहुचर्चित अशा भटाळी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ बुधवारी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत व प्रतिष्ठित ...

राजापूर

: शहरातील बहुचर्चित अशा भटाळी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ बुधवारी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत व प्रतिष्ठित नागरिक विवेक गुणे यांच्या हस्ते पार पडला.

राजापूर शहरातील मुख्य रस्त्याला जोडून भटाळी भागात जाणाऱ्या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. हा रस्ता मुख्य रस्त्यापासून ते अगदी कोदवली ग्रामपंचायत हद्दीपर्यंत पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसह वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. मागील काही वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. अखेर या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असून, या कामाचे भूमिपूजनही पार पडले.

नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेना गटनेते विनय गुरव, नगरसेवक सुलतान ठाकूर, सौरभ खडपे, अनिल कुडाळी, भाजप नगरसेवक गोविंद चव्हाण, रमेश गुणे, डाॅ. उत्तम प्रभूदेसाई, संगीता चव्हाण, पत्रकार महेश शिवलकर, ठेकेदार डी. एम. चव्हाण उपस्थित होते.