शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यावर जमा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

रत्नागिरी : शालेय पोषण आहाराची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयातील त्रुटीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण ...

रत्नागिरी : शालेय पोषण आहाराची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयातील त्रुटीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले. यात बँक खाते उघडण्यासाठी मुलांना बँकेत न पाठविता त्यांच्या पालकांच्या खात्यावर ही रक्कम जमा करावी, अशी मागणी उपजिल्हा अध्यक्ष रूपेश सावंत यांनी या निवेदनात केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शासन निर्णयानुसार सर्व शालेय विद्यार्थ्यांना शाळांमार्फत प्रशासनाकडून पोषण आहार दिला जातो. त्या अंतर्गत २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून पात्र विद्यार्थ्यांना पोषण आहारइतकीच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; परंतु केवळ नी केवळ आधारकार्ड लिंक असलेल्या विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यामध्ये रक्‍कम जमा करण्याचा निर्णय झाला असल्याचे कळते. वास्तविक बहुतांश विद्यार्थ्यांचे बँकखाते अस्तित्वात नाहीत. अशा विद्यार्थ्यांना या कोरोना महामारीच्या काळात बँक खाते उघडण्याचा बालहट्ट आपणाकडून करण्यात आला आहे. याचे नेमके प्रयोजन काय? असा प्रश्न करण्यात आला आहे.

या कोरोना महामारीच्या काळात विशेषतः तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका आहे, असा शासनाचाच अहवाल आहे. असे असताना या विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यासाठी बँकेच्या दारात रांगेमध्ये उभे करणे कितपत योग्य आहे, अशी विचारणाही या निवेदनात करण्यात आली आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्यानंतर रांगेत उभे राहताना मुलांना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करावी, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपजिल्हा अध्यक्ष रूपेश सावंत यांनी या निवेदनात केली आहे.

हे निवेदन शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना देताना मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, मनसे कामगार सेना जिल्हा चिटणीस छोटू खामकर, शहराध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष मयुरेश मडके, सिद्धेश धुळप, बिपीन शिंदे, सुरक्षारक्षक जिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो मजकूर

पोषण आहार रकमेबाबत शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना निवेदन देताना मनसे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, मनसे कामगार सेना जिल्हा चिटणीस छोटू खामकर, शहराध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष मयूरेश मडके, सिद्धेश धुळप, बिपीन शिंदे, सुरक्षारक्षक जिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर व पदाधिकारी उपस्थित होते.