शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आबलोली गावात दारुबंदीसाठी सर्व महिला एकवटल्या

By admin | Updated: January 30, 2015 23:15 IST

ग्रामसभेतील निर्णय : केवळ ठराव नाही तर अंमलबजावणी

असगोली : आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच प्रमोद गोणबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मराठी शाळा येथे उत्साहात झाली. यावेळी सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. त्यानंतर सविता विठ्ठल पागडे यांनी सर्वांचे लक्ष वेधत दारुबंदी झालीच पाहिजे, तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊन फॅशन म्हणून दारु पित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. तरुणपिढी बरबाद होऊ नये, म्हणूनच आबलोली गावात दारुबंदी झालीच पाहिजे असा ठराव मांडताच सर्व महिला एकवटल्या व दारुबंदीचा ठराव संमत केला गेला. या ठरावाला मिनल कदम, सुप्रिया साळवी यांनी अनुमोदन दिले व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.दारुबंदीसाठी आबलोली गावातर्फे महिलांची जाहीर सभा घेण्यात येणार असून पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्यासाठी पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे. यावेळी सरपंच प्रमोद गोणबरे, उपसरपंच प्रमेय आर्यमाने, सदस्य विजय वैद्य, नरेश निमूणकर, सदस्या मोहिनी पांचाळ, मानसी पागडे, अस्मिता रेपाळ, रसिका कदम, विनिता बाईत, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, ग्रामसेवक नाईक, पोलीसपाटील महेश भाटकर, उल्हास काळे, सुभाष काजरोळकर, महेंद्र कदम, सचिन बाईत, सचिव कारेकर यांच्यासह या ग्रामसभेला १२२ ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिला उपस्थित होत्या. या निर्णयामुळे तालुक्यातील अन्य गावातील महिलांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)