शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्वच सायबर कॅफे बेकायदा

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

परवान्यासाठी डीडी-५ या विशेष नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो.

रत्नागिरी : जिल्ह्यात ५० सायबर कॅफे कार्यरत असून, हे सर्व कॅफे बिगर परवाना असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. यापैकी एकाही सायबर कॅफे चालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक परवाना घेतलेला नसून, शासनाचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांंच्या मार्गदर्शनानुसार रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर परिसरातील १० सायबर कॅफे चालकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. या दहाजणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात सायबर कॅफेचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अलिकडे स्मार्ट फोनमुळे इंटरनेट घरोघरी उपलब्ध होत असल्याने सायबर कॅफेत जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. असे असले तरी जिल्ह्यात अद्यापही ५० सायबर कॅफे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे शॉप अ‍ॅक्टनुसार व्यवसाय परवाने असले तरी सायबर कायद्यानुसार अशा सायबर कॅफेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत परवाना घेणे आवश्यक आहे. परवान्यासाठी डीडी-५ या विशेष नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. मात्र, जिल्ह्यातील कार्यरत एकाही सायबर कॅफेकडून असा अधिकृत परवाना घेतला गेलेला नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिंंदे यांनी यापूर्वी सायबर शाखेत वरिष्ठ म्हणून काम केल्याने जिल्ह्यातील सायबर कॅफेंची माहिती घेतली. त्यावेळी जिल्ह्यात कोणाकडेही अधिकृत परवाना नाही, असे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पांडे, गुुन्हा अन्वेषणचे सुनील पवार यांच्या पथकाने सायबर कॅफेबाबत माहिती गोळा करून त्यानंतर रत्नागिरी शहर परिसरातील १० सायबर कॅफेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली व गुन्हे दाखल करण्यात आले. बेकायदा सायबर कॅफे चालविणाऱ्या या दहा जणांना न्यालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. झालेला दंड या कॅफे चालकांनी भरला आहे. (प्रतिनिधी)