खडपेवठार येथून दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:14+5:302021-06-02T04:24:14+5:30

रत्नागिरी : शहरातील खडपेवठार येथे बेकायदेशीरपणे विदेशी बनावटीची दारू विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल ...

Alcohol confiscated from Khadpevathar | खडपेवठार येथून दारू जप्त

खडपेवठार येथून दारू जप्त

रत्नागिरी : शहरातील खडपेवठार येथे बेकायदेशीरपणे विदेशी बनावटीची दारू विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १८ हजार ८६४ रुपयांची दारू आणि ६० हजार रुपयांची वॅगनार कार असा एकूण ७८ हजार ८६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३१ मे रोजी सायंकाळी ४.१० वाजण्यात केली.

सचिन रघुनाथ कोतवडेकर (३६, रा. खडपेवठार, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद भार्गव कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सचिनने आपल्याकडे बिगरपरवाना विदेशी दारूच्या १०८ बाटल्या ठेवल्या होत्या. पाेलिसांनी हा माल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पालांडे करत आहेत.

Web Title: Alcohol confiscated from Khadpevathar