शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची वरिष्ठांकडून कानउघाडणी

By admin | Updated: May 22, 2015 00:14 IST

रत्नागिरी पालिका : शिवसेनेच्या गटनेत्याचाही समावेश

रत्नागिरी : आरक्षित भूखंड मूळ मालकांना स्वखर्चाने विकसित करण्यासाठी देण्याचा ठराव मांडणाऱ्या तीन नगरसेवकांची जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह वरिष्ठांनी खास शैलीत कानउघाडणी केली आहे. या तीन नगरसेवकांमध्ये पालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्याचाही समावेश आहे. मंगळवारी झालेल्या रत्नागिरी पालिकेच्या सभेत या तीन नगरसेवकांनी आरक्षित भूखंडाचा ठराव मांडताना हे भूखंड मूळ मालकांना स्वखर्चाने विकसित करण्यासाठी द्यावेत, असे म्हणणे मांडले होते. याबाबत सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी संतापले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या तिन्ही नगरसेवकांना विश्रामगृहावर बोलावून घेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांची कानउघाडणी करण्यात आली. आपल्याला जनतेने शहर विकासासाठी संधी दिली आहे, याचे भान ठेवा, अशा शब्दात या नगरसेवकांची खरडपट्टी काढण्यात आली. एवढेच नव्हे; तर या ठरावाची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून, पुढील पालिका सभेत इतिवृत्ताला मान्यता देताना हा ठराव नामंजूर करण्याचे आदेश नगरसेवकांना देण्यात आले आहेत. मांडलेल्या ठरावानुसार पालिका हद्दीतील तब्बल १३५ आरक्षित भूखंड मूळ मालकांना परत देण्याचे ठरवण्यात आले होते. या ठरावावरून शिवसेनेत फूट पडली होती. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राहुल पंडित, सलील डाफळे, स्वीकृत नगरसेवक विकास पाटील यांनी या ठरावाला विरोध दर्शवला होता. मात्र, हा विरोध डावलून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी या ठरावाला मंजुरी दिली होती. शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा शहरभर पसरल्याने तसेच आरक्षित भूखंडाबाबत सेनेमध्ये दोन गट पडल्याने याची दखल वरिष्ठांना घेणे भाग पडले. त्यामुळे या नगरसेवकांची कानउघाडणी करण्यात आली. (प्रतिनिधी)