शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून काेराेनामुळे मृत पावलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

रत्नागिरी : काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. लांजा ...

रत्नागिरी : काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. लांजा आणि संगमेश्वर येथील दाेन कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या वारसांना ही मदत देण्यात आली.

बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कोविड-१९चे संक्रमण काळात सुरुवातीपासून लॉकडाऊनमध्येही बँकेचे अधिकारी व कर्मचारी बँकेच्या ग्राहकांना अखंडपणे अविरत सेवा पुरवित आहेत. बँकेचे कर्मचारी व प्राथमिक शेती संस्थांचे सचिव सातत्याने बँकेच्या कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून कोविड-१९च्या प्रादुर्भावाने बँक कर्मचारी व शेती संस्थांचे सचिव यांचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेण्यात आला हाेता.

या निर्णयानुसार लांजा शाखेतील बँकेचे कर्मचारी प्रवीण प्रभाकर कदम व संगमेश्वर शाखेतील अशोक गणपत चव्हाण यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक रमेश दळवी, सुधीर कालेकर, डॉ. अनिल जोशी, राजेंद्र सुर्वे, आदेश आंबोळकर, महादेव सप्रे, गणेश लाखण, आमदार शेखर निकम, ॲड. दीपक पटवर्धन, दिनकर मोहिते, मधुकर टिळेकर, जयवंत जालगावकर, चंद्रकांत बाईत, अमजद बोरकर, नेहा माने, माधुरी गोखले, तज्ज्ञ संचालक विवेक के. रेळेकर व ॲड. पूजा प्रियेश तलाठी, कर्मचारी प्रतिनिधी जितेंद्र साळवी, दिलीप लाड व बँकेचे कार्यकारी संचालक सुनील गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण व सुधीर गिम्हवणेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी शिक्षणाचे धाेरण निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत आमदार शेखर निकम यांचा समावेश करण्यात आल्याने सत्कार करण्यात आला.

----------------------------

कृषी शिक्षणाचे धाेरण निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत आमदार शेखर निकम यांचा समावेश करण्यात आल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष डाॅ. तानाजीराव चाेरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक उपस्थित हाेते.