शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

Nagar Panchayat Election : राजकीय वादात लक्षवेधी ठरलेल्या दापोलीत पहिल्या टप्यात ३१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 1:27 PM

दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे.

दापोली : शिवसेनेतील दोन दिग्गज नेत्याच्या वादामुळे दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. अतिशय विखारी आणि हाय होल्टेज प्रचारामुळे दापोली नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात ३१ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारणार हेच पाहावे लागणार आहे. प्रचाराचा धुरळा उडाल्यामुळे मतदान कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष होते परंतु आज सकाळपासूनच दापोली, मंडणगड दोन्ही नगरपंचायत निवडणुकीत मतदान मात्र शांततेत सुरू आहे. दोन्ही तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नाही. परंतु वातावरण मात्र तणावपूर्ण असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. तर, काँग्रेस, मनसे, भाजपा स्वतंत्र निवडणूक लढत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकVotingमतदानDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत