लांजात आढळले ३१ काेराेना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:38+5:302021-06-02T04:24:38+5:30

लांजा : तालुक्यात मंगळवारी एकूण ३१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रॅपिड कोरोना चाचणीतील एकजणांचा समावेश आहे. मंगळवारी ...

31 patients were found in Lanza | लांजात आढळले ३१ काेराेना रुग्ण

लांजात आढळले ३१ काेराेना रुग्ण

लांजा : तालुक्यात मंगळवारी एकूण ३१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रॅपिड कोरोना चाचणीतील एकजणांचा समावेश आहे.

मंगळवारी करण्यात आलेल्या अँटिजन कोरोना चाचणीत १२ जण, तर करण्यात आलेल्या आरटीपीसीआर कोरोना अहवालात १८ जण असे एकूण ३० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत़ यामध्ये व्हेळ २, लांजा आगरगांव २, आगवे १, कोंड्ये बौद्धवाडी २, कुरचूंब १, साटवली मुस्लिमवाडी १४, भडे १, लांजा शेट्येवाडी १, लांजा लिंगायतवाडी १, हर्दखळे बौद्धवाडी १, आंजणारी २, लांजा कुंभारवाडी १, देवधे बौद्धवाडी येथील एकाचा समावेश आहे; तर शहरामध्ये फिरणाऱ्या २२ नागरिकांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वच जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत; तर ३३ जणांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली होती़ त्यामध्ये एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या २२२४ झाली आहे; तर तालुक्यात ३३७ जण कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 31 patients were found in Lanza