weekly horoscope 22 september to 28 september 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019

मेष

 

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आर्थिक लाभासह घरातील वातावरण सुद्धा आनंदी राहील. आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना सावध राहणे आपल्या हिताचे होईल. दरम्यान कोर्ट - कचेरी व कोणास जामीन राहण्यापासून दूर राहणे उपयुक्त ठरेल. नवीन कामे आनंदाने व उत्साहाने केल्यास आपण त्यात यशस्वी व्हाल. मात्र, मनात गोंधळ निर्माण झाल्याने एखाद्या निष्कर्षाप्रत येण्यात त्रास होईल. दरम्यान आपले नुकसान होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला आहे... आणखी वाचा

वृषभ

हा आठवडा आपणास मिश्र फलदायी आहे. नोकरीत वरिष्ठांशी जपून राहावे लागेल. विरोधकांचा जोर वाढणार असल्याने विचारपूर्वक प्रत्येक पाऊल उचलावे लागेल. सध्या महत्वाचा निर्णय लांबणीवर टाकणे हितावह ठरेल. व्यापारातील वसुली झाल्याने आर्थिक चिंता दूर होतील. नोकरीत हळू हळू परिस्थिती सुधारू लागेल. शासनाकडून काही लाभ संभवतो. सर्व त्रास दूर झाल्याने आपण तणावमुक्त होऊ शकाल. नोकरी - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. वरिष्ठांचा पाठिंबा व मार्गदर्शन मिळाल्याने आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. ह्या आठवड्यात नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात आपल्या प्रगतीस मदतरूप ठरतील... आणखी वाचा

मिथुन 

आठवड्याची सुरवात छान होईल. आपली कामे पूर्ण करण्यात आपण आपला बहुतांश वेळ द्याल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य आपणास मिळेल. व्यापारात येणारे शासकीय अडथळे दूर होतील. आठवड्याच्या मध्यास आपल्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही असे आपणास वाटेल, मात्र दोनच दिवसात परिस्थितीत अनुकूल बदल झाल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता होण्यात अडचणी येतील. ह्या आठवड्यात कुटुंबियांसह आपण प्रवासास जाऊ शकाल. आठवड्याच्या सुरवातीस वैवाहिक जीवनात काही वाद होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कर्क 

आठवडा मिश्र फलदायी आहे. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. शासना विरुद्ध किंवा अवैध कामे आपणास अडचणीत आणतील. सोपविण्यात आलेली कामे योजनेनुसार करावीत, अन्यथा वेळेवर कामे न झाल्याने वरिष्ठ किंवा गिर्हाइकांसमोर आपली नाचक्की होईल. त्यामुळे अखेर आपलेच नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी सावधपणे काम करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकणार नाही. दरम्यान कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत यश प्राप्ती होईल. व्यापारासाठी केलेल्या प्रवासातून आपला फायदा होईल... आणखी वाचा

सिंह

आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपल्या एखाद्या नव्या मैत्रीचा भविष्यात आपणास फायदा होईल. सरकारी व निम सरकारी कामात आपणास यश मिळू शकेल. वरिष्ठ व पूजनीय व्यक्तींचा सहवास घडेल. अचानक धनलाभ झाल्याने आपण आनंदित व्हाल. दीर्घकालीन गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल. झटपट लाभ मिळविण्याच्या नादात आपले नुकसान होऊ शकते. प्रत्येक कार्यात यश मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. मात्र, निर्णय क्षमतेच्या अभावाचा आपणास त्रास होईल. देवाण - घेवाणीत सावध राहावे लागेल. कोर्टाच्या कामात कोणाला जामीन राहू नये. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा

कन्या

आठवडा आपणास मिश्र फले देणारा आहे. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण राहील. ईर्ष्याळू व्यक्ती वरिष्ठांचे कान फुंकून आपणास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील, मात्र आपण काळजी करू नये. त्यातून बाहेर पडण्याचा आपण यशस्वी प्रयत्न करू शकाल. आपण नवीन काम करण्यास प्रेरित व्हाल. आठवड्याच्या सुरवातीस व्यापारात कष्टाच्या मानाने अपेक्षित यश आपणास मिळणार नाही. उत्तरार्धात मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. त्यांना अभ्यासात अधिक परिश्रम करावे लागतील. भावंडांशी सलोखा राहील... आणखी वाचा

तूळ 

आठवडा आपली अपेक्षापूर्ती करणारा आहे. आपण व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कामासाठी बाहेरगांवी जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकाल. मात्र, व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात निराशा आपल्या पदरी पडेल. आवेशात एखादे चुकीचे काम करू नये. कार्यात यशस्वी होण्यात विलंब होऊ शकेल. नोकरीत मात्र बढती संभवते. कार्यालयात महत्वाच्या विषयांवर वरिष्ठांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. आपणास कौटुंबिक बाबतीत गंभीरता पूर्वक लक्ष घालावे लागेल. संततीकडून लाभ होईल... आणखी वाचा

वृश्चिक 

हा आठवडा आपणास अंशतः चांगला राहील. आपण नवीन काम करण्यास प्रेरित व्हाल. चंचल मनामुळे आपण द्विधेत राहाल. कार्यस्थळी किंवा व्यवसायात स्पर्धा होईल. कामा निमित्त एखादा प्रवास करावा लागेल. नवीन घराची खरेदी करू शकाल. भावंडांशी सलोखा टिकून राहील. त्यातून लाभ सुद्धा होईल. घराची रंग रंगोटी किंवा दुरुस्ती करू शकाल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी आपण करू शकाल. भागीदारीचा करार करताना काळजी घ्यावी लागेल. कार्यालय किंवा महिला वर्गा कडून नुकसान संभवते. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मध्यम आहे. वरिष्ठांच्या मदतीने शाळा किंवा कॉलेजचा प्रकल्प पूर्ण करू शकाल... आणखी वाचा

धनु 

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी असून नवीन कामाच्या सुरवातीस तो अनुकूल नाही. एखादा प्रवास करावा लागला तरी त्यात त्रास होण्याची शक्यता आहे. आयात - निर्यातीशी संबंधित व्यापारात लाभ व यश मिळेल. धन लाभ संभवतो. दैनंदिन कामात आलेले अडथळे आपण सहजपणे दूर करू शकाल. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळावेत. आर्थिक व व्यावसायिक लाभ होतील. व्यवसायात एखादी नवीन योजना तयार करू शकाल. दीर्घकालीन आर्थिक योजना पूर्णत्वास जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायी आहे. सरकार किंवा त्याच्याशी संबंधित कामातून लाभ होईल... आणखी वाचा

मकर

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास थोडी काळजी वाटू शकते. काही कारणाने आपल्या एखाद्या कामाचा खोळंबा होईल. त्यामुळे आपण बेचैन व्हाल. नोकरी करणाऱ्यांना कार्यलयात एखाद्या महत्वाच्या कामासाठी वरिष्ठांशी सल्ला - मसलत करावी लागेल. कामा निमित्त एखादा प्रवास सुद्धा करावा लागेल. आठवड्यात कामाची व्याप्ती वाढेल. व्यापार वृद्धीच्या योजनेत प्रगती होत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास सरकारी व बिन सरकारी कामात फायदा संभवतो. आठवड्यात विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. मित्रांसह खरेदीसाठी किंवा बाहेर फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकाल... आणखी वाचा

कुंभ

आठवडा आपणास विशेष फलदायी ठरणारा आहे. आपली आर्थिक उन्नती होईल. एखाद्या नवीन कामाची सुरवात सुद्धा करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना मात्र आठवड्याच्या सुरवातीस विरोधकांचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसा पर्यंत आपण आपले उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्याच्या स्थितीत राहाल. व्यापार वृद्धीचे प्रयत्न सुद्धा आठवड्याच्या अखेर पर्यंत यशस्वी होतील. विरोधकांवर सहजपणे आपणास मात करता येईल. आठवड्यात कार्यालयात वरिष्ठांशी व व्यवसायात भागीदारांशी वाद टाळावे लागतील. आर्थिक बाबींसाठी आठवडा उत्तम आहे. घराचे सुशोभीकरण, कुटुंबियांसाठी महागडी वस्त्र व सुख - सोयींसाठी सामान खरेदीत आपण थोडा जास्तच खर्च कराल... आणखी वाचा

मीन

आठवड्यात नकारात्मक विचारांपासून आपणास दूर राहावे लागेल. नोकरीत विरोधकांचा सामना करावा लागेल. काही मंडळीनी आपल्या विरुद्ध वरिष्ठांचे कान जरी फुंकले तरी आपण आपले काम चोखपणे करावे. आठवड्याच्या अखेर पर्यंत मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. व्यापारात आपणास नवीन योजना करण्याची आवश्यकता भासेल. आपल्या योजनेनुसार व्यापारातील विस्तार किंवा नवीन प्रकल्पाचे आयोजन करून आपण त्यात फायदा मिळवू शकाल. जमीन व घर इत्यादींच्या दस्तावेजात आपली फसवणूक संभवते. आठवड्यात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. एखाद्या फसव्या योजनेत आपले मोठे नुकसान होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात जोर लावावा लागेल... आणखी वाचा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: weekly horoscope 22 september to 28 september 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.