आजचे राशीभविष्य - 4 नोव्हेंबर 2021 - कुंभसाठी शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल अन् धनुसाठी उत्पन्नात वाढीचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:27 AM2021-11-04T07:27:54+5:302021-11-04T07:28:24+5:30

Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 4 November 2021 | आजचे राशीभविष्य - 4 नोव्हेंबर 2021 - कुंभसाठी शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल अन् धनुसाठी उत्पन्नात वाढीचे योग

आजचे राशीभविष्य - 4 नोव्हेंबर 2021 - कुंभसाठी शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल अन् धनुसाठी उत्पन्नात वाढीचे योग

Next

मेष
वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. उग्र विचार आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल.  आणखी वाचा

वृषभ
आजचा दिवस शुभफलदायी जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. अर्थ विषयक लाभाची शक्यता.  आणखी वाचा

मिथुन
आज शरीर आणि मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामात खर्च करावा लागेल. आणखी वाचा

कर्क
पला आजचा दिवस अशुभ आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात.  आणखी वाचा

सिंह
आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. आणखी वाचा

कन्या
आजचा दिवस आपल्याला शुभफल देईल. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासोबत सुखात दिवस जाईल. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. सृजनात्मक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल.  आणखी वाचा

वृश्चिक
दुर्घटनेपासून सावध राहण्याचा, शस्त्रकियेचा निर्णय न घेण्याचा आणि वादात न पडण्याचा इशारा. बोलण्यात कोणाचा अपसमज होऊ नये याकडे लक्ष द्या. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल.  आणखी वाचा

धनु
आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. गृहस्थ जीवनाचा पूर्णतः आनंद घ्याल. मित्रांसमवेत रम्य ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नात वाढीचे योग आहेत. आणखी वाचा

मकर
आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आणखी वाचा

कुंभ
शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी राहील त्यामुळे काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी पण आपणाला खुपेल. आणखी वाचा

मीन
ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च करावा लागेल. आणखी वाच

Web Title: Today's horoscope - 4 November 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.