आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२१: कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्योदय, धनलाभाचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 07:20 AM2021-09-22T07:20:58+5:302021-09-22T07:25:59+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope september 22 2021 know what your rashi says rashibhavishya | आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२१: कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्योदय, धनलाभाचे योग

आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२१: कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्योदय, धनलाभाचे योग

Next

मेष - आज धार्मिक-आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक- मानसिक बेचैनी राहील. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. अधिक वाचा

वृषभ - व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. संततीकडून शुभवार्ता मिळतील. अधिक वाचा

मिथुन - शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. अधिकारी प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्याकडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी राहणार नाहीत. अधिक वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदयाबरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून सुवार्ता मिळतील. धार्मिक कार्य किंवा यात्रा यावर खर्च होईल. कुटुंबीय आणि पदाधिकारी यांच्या समवेत दिवस सुखकारक राहील. अधिक वाचा

सिंह - आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील व्यक्तींशी मतभेद होतील. अनैतिक कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. इष्ट देवतेचे नामस्मरण आणि आध्यात्मिक विचार आपणाला योग्य मार्गदर्शन करतील. अधिक वाचा

कन्या - श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इ. खरेदी होईल. भिन्नलिंगीय व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. धनलाभ होईल. अधिक वाचा

तूळ - श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता आणि यश मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल आणि सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. अधिक वाचा

वृश्चिक - आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक नियोजनासाठी वेळ चांगली आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद यात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. अधिक वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की आज जास्त संवेदनशीलतेमुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. तब्बेतीच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. अधिक वाचा

मकर - आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार धंद्यात लाभ होईल. शेअर- सट्टायात गुंतवलेले पैसे लाभ देतील. मित्र, स्वकीय आणि भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना सिद्धी प्राप्त होईल. श्रीगणेशाची आपणावर कृपा राहील. अधिक वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना मध्यम दिवस. अधिक वाचा

मीन - आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. अधिक वाचा
 

Web Title: todays daily horoscope september 22 2021 know what your rashi says rashibhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.