आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 01:08 IST2025-07-03T01:06:13+5:302025-07-03T01:08:57+5:30

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत.

rajasthan family suicide The mother dressed her son up like a girl, took photos of him happily, and the entire family ended their lives at the same time What exactly happened | आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?

आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?

राजस्थानच्या बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या लहाण मुलाला, दागिने घालून आणि मेकअप करून, त्याचा एखाद्या मुली प्रमाणे श्रृंगार केला. यानंतर या चार सदस्यांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करत जीवन संपवले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत.

शिवलाल मेघवाल (35 वर्ष), त्याची पत्नी कविता (32 वर्ष), दो मुलं बजरंग (9 वर्ष) आणि रामदेव (8 वर्ष), असे सामूहिक आत्‍महत्‍या करणऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी कविताने तिचा धाकटा मुलगा रामदेव याला मुलीचे कपडे घातले. दागिने घातले, डोळ्यात काजळ आणि कपाळावर गंध लावले, त्याचे फोटो काढले. यानंतर संपूर्ण कुटुंबाने पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली.यानंतर, बुधवारी सकाळी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

असं आहे संपूर्ण प्रकरम -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर, या जोडप्याच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. यासंदर्भात बोलताना पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) मनराम गर्ग म्हणाले, शिवलालच्या धाकट्या भावाने फोन त्याला केला. मात्र, कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही. यानंतर, त्याने एका शेजाऱ्याला बघण्यासाठी पाठवले. मात्र, त्यलाही काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. यानंतर, त्याने पोलिसांना सूचना दिली. आता पोलिस प्रकरमाचा तपास करत आहेत.
 
सुसाईड नोटमध्ये काय? -
घरातून शिवलालच्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट सापडली. हे तीन पानांची ही नोट २९ जून रोजी लिहिले गेली आहे. सुसाईड नोटमध्ये शिवलालने हे पाऊल उचलल्याबद्दल तीन जणांना जबाबदार धरले आहे, त्यांपैकी एक शिवलालचा धाकटा भाऊ आहे.

सुसाईड नोटमध्ये जमिनीच्या वादावरून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाचा उल्लेख आहे. तसेच, चौघांचाही अंत्यसंस्कार त्यांच्या घरासमोरच करावा, असेही सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. याच वेळी, शिवलालला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर झालेल्या निधीचा वापर करून एक वेगळे घर बांधण्याची इच्छित होते. मात्र, त्याच्या आईचा आणि भावाचा त्याला विरोध होता, असे कविताच्या काकांनी म्हटले आहे.
 

Web Title: rajasthan family suicide The mother dressed her son up like a girl, took photos of him happily, and the entire family ended their lives at the same time What exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.