जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 00:17 IST2025-10-14T23:51:31+5:302025-10-15T00:17:16+5:30
Jaisalmer Tragedy: राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली.

जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. जोधपूरकडे जाणाऱ्या एका खासगी बसला युद्ध संग्रहालयाजवळ अचानक आग लागली. सुरुवातीला मृतांचा आकडा १२ असण्याचा अंदाज होता, परंतु आता मृतांचा आकडा २० वर पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्यामुळे काही क्षणांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांसाठी मदतीचीही घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस मंगळवारी दुपारी ३ वाजता ५० हून अधिक प्रवाशांसह जैसलमेरहून निघाली. परंतु, थायत गावाजवळून जात असताना बसच्या मागून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच संपूर्ण बस पेटली. अनेक जण खिडक्या आणि दरवाज्यांमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि जवळच्या लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेवर जवळपास २० जणांचा मृत्यू झाल्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे.
Distressed by the loss of lives due to a mishap in Jaisalmer, Rajasthan. My thoughts are with the affected people and their families during this difficult time. Praying for the speedy recovery of the injured.
— PMO India (@PMOIndia) October 14, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of…
या दुःखद घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले "जैसलमेर बस दुर्घटनेबद्दल मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी दुःख व्यक्त करतो. ज्यांनी त्यांचे जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो", असे मोदी म्हणाले. याचबरोबर त्यांनी अपघातग्रस्तांसाठी मदतीचीही घोषणा केली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत म्हणून देण्यात येतील.