शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोहा तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा

By admin | Updated: April 12, 2017 03:50 IST

जिल्ह्यातील सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यात्रेचे

रोहा : जिल्ह्यातील सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भक्ताच्या पाठीला गळ टोचून त्यास खांबावरील लाकडाला टांगून फिरवण्यात आले आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दणाणून गेला.येथील भातसई यात्रेची उत्सुकता दरवर्षी लोकांना असते, या यात्रेच्या तयारीसाठी भातसई, मेढा,लक्ष्मीनगर व झोळांबे या परिसरातील गावे लागलेली असतात. या वर्षीही या यात्रेची जय्यत तयारी गावातील ग्रामस्थ व भक्तगणांनी केली होती. घराला रंगरंगोटी, रांगोळीने व पताकांनी गावे सजविली होती. पूर्वसंध्येला पालखी मिरवणूक गावातीलपरिसरातून काढण्यात आली. गावातील सर्व भक्तगणांनी मोठ्या भक्तिभावाने या पालखीची पूजा-अर्चा करून मातेचे दर्शन घेतले. पारंपरिक खालू बाजा व पाश्चिमात्य डीजेच्या तालावर पालखी उत्सव संपन्न झाला. नजीकच्या गावातील मानाच्या महादेवाच्या काठ्या वाजत-गाजत मंदिराच्या परिसरात येतात. सांयकाळी गळटोचणी कार्यक्र माची उत्सुकता उपस्थित भक्तगणांत असते. या गावातील मातेच्या भक्तगणांना गळ टोचून खांबावरील लाकडाला टांगून फिरवण्यात आले. यावेळी सर्वत्र ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. हा क्षण हजारो भक्तगणांनी आपल्या नजरेत टिपला. या व्यतिरिक्त नवसपूर्तीसाठीही काही भक्तगणांनी गळ टोचून घेतले होते.मोठ्या प्रमाणात मिठाई, खेळणी, बांगड्या, कलिंगड, शीतपेय आदी दुकाने यात्रेत थाटण्यात आली होती. या सोहळ्यास मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसह राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. चैत्र पौर्णिमेच्या दिनी धार्मिक कार्यक्र मचैत्र पौर्णिमेचा दिवस हा धार्मिक देवखर्चासाठी वर्षातून एकमेव असा येणारा दिवस म्हणून महत्त्वाचा मानला जातो. ग्रामीण भागात हा दिवस प्रसिद्ध असून आजच्या या दिवसाचे महत्त्व आणि औचित्य साधून कुटुंबातील कुलदेवांचा, तसेच गावदेवांचा देवखर्च म्हणजेच देणे मागणेचा धार्मिक कार्यक्र म केला जातो. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या या दिवसाला ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने काही ठिकाणी देवांना गोडा म्हणजेच शाकाहारी अन्नप्रसादाचे मानपान दाखविले जाते, तर काही ठिकाणी तिखट अन्नप्रसादाचे मानपानही दाखविले जाते. गावदेवांमध्ये श्री धावीर महाराज, श्री बापुजी बुवा, श्री काळकाई माता, सौरंग बापुजी बुवा, श्री क्षेत्रपाल आदी देवांचा देवखर्च ग्रामस्थ आणि भक्तगणांनी आजच्या पौर्णिमेच्या निमित्ताने केला.