शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वाहनांची वर्दळ

By admin | Updated: September 16, 2015 23:58 IST

गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

पनवेल : गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी यावेळी वाहतूक पोलिसांची असते. त्यादृष्टीने महामार्गावर विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असून तब्बल ३५० वाहतूक पोलीस व २० ते २५ अधिकाऱ्यांंना बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. मुंबईमधून सर्वात जास्त वाहने कोकणाकडे रवाना होतात. सायन पनवेल महामार्गाचे रुंदीकरण यावर्षी पूर्ण झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र खारघर टोल नाक्यावर कामोठे टोल प्लाझावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी अगदी खारघर टोल नाक्यापर्यंत पोहचली होती. बुधवारी संध्याकाळीदेखील परिस्थिती जैसे थेच असल्याचे पहावयास मिळाले. पनवेल शहरातून गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. ही प्रवेशबंदी विर्सजनापर्यंत कायम राहणार आहे. कळंबोली सर्कलपासून ट्रक, टूरीस्ट वाहने, एसटी, टे्रलर, ट्रक, टेम्पो आदी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जी पर्यंत वळविण्यात आली आहेत. तक्का, पळस्पे फाटा तसेच पनवेल शहराबाहेरील अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पाच लाखापेक्षा जास्त चाकरमानी खाजगी अथवा एसटी महामंडळाच्या वाहनांनी रवाना झाले.यावर्षी ४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कोकणवासीयांसाठी पनवेल ते चिपळूण ही १२ डब्यांची विशेष टे्रन सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या वर्गासाठी एक डबा व एक महिला वर्गासाठी डबा ठेवण्यात आला आहे. या टे्रनमध्ये जाण्यासाठी देखील प्रवाशांची मोठी गर्दी पनवेल रेल्वे स्थानकावर होती.मागील तीन दिवसापासून या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे बुधवारी दिसून आले. तसेच खारघर हिरानंदानी बस थांबा, कळंबोली, पनवेल याठिकाणच्या बसस्थानकावर देखील प्रवासी मोठ्या संख्येने थांबल्याचे दिसून येत आहेत. गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यामुळे पुढच्या दहा दिवसापर्यंत दोन्ही महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरु राहणार आहे. लाखो वाहने मुंबई गोवा महामार्गावरुन कोकणाकडे रवाना झाली आहेत. खारपाडा टोलनाक्यावर या वाहनांची गणना केली जात होती. मात्र या वर्षी खारपाडा टोल नाका बंद झाल्याने वाहनांची निश्चित आकडेवारी वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे समजले. (वार्ताहर)कोकणाकडे जाताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे रवाना होत असतात यामध्ये खाजगी गाड्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यातच अरुंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते म्हणून वाहन चालकांनी याबाबत योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. याकरिता महामार्गावर तब्बल ३५० वाहतूक कर्मचारी व २० ते २२ अधिकारी महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. - अरविंद साळवे, वाहतूक पोलीस उपायुक्त