दहिवलीत पत्नीसह दोन मुलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:19 IST2019-11-08T01:18:28+5:302019-11-08T01:19:30+5:30

अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Two children killed along with wife in Dahivali | दहिवलीत पत्नीसह दोन मुलांची हत्या

दहिवलीत पत्नीसह दोन मुलांची हत्या

माणगाव : तालुक्यातील दहिवली गावात पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची गळा दाबून हत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ही घटना म्हणजे माणुसकीला काळीबा फासणारी असून माणसाचं हृदय पिटाळूून लावणारी आहे. दहीवली गावातील संतोष शिंदे (३६, रा. दहीवली)याने आपली पत्नी सुहानी संतोष शिंदे, मोठा मुलगा पवन शिंदे (४), लहान मुलगा संचित शिंदे (२) यांचा गळा आवळून हत्या के ली. त्यानंतर आपण आपल्या पत्नी आणि मुलांना मारल्याची कबूली गावाच्या पोलीस पाटील यांना भेटून दिली. घरात होणाऱ्या कौटुंबिक वादातून मारल्याचे त्याने सांगितले. हे तिन्ही मृृतदेह शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

च्मृतदेह शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले आसता प्रभारी अधीक्षक डॉ. गौतम देसाई यांनी शवविच्छेदन येथे होणार नाही सांगितले, यामुळे आणलेल्या तिन्ही शव बराच वेळ टेम्पोतच ठेवल्याने ग्रामस्थ संतापले. या वेळी सुभाष केकाणे व संतप्त ग्रामस्थांनी डॉ देसाई यांना घेराव घातला. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशिद व सुभाष केकाणे यांच्या मध्यस्थीने डॉ. देसाई यांनी शवविच्छेदन करीत असल्याचे स्पष्ट के ले.

 

Web Title: Two children killed along with wife in Dahivali