शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

By admin | Updated: April 27, 2017 00:06 IST

मुरुड तालुक्यातील नांदगाव तलाठी कार्यालयाचे तलाठी संजय शिंगे व याच विभागात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी साहेबराव साबळे

नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील नांदगाव तलाठी कार्यालयाचे तलाठी संजय शिंगे व याच विभागात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी साहेबराव साबळे यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग अलिबाग कार्यालयाने रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे सर्व शासकीय कार्यालयात भीतीचे वातावरण आहे.अदाड या गावामधील गट नंबर ५०३ या जमिनीची खरेदी लाचलुचपत विभागात तक्र ार दाखल करणारे मुरु ड तालुका शिवसेना संघटक यशवंत पाटील यांचे भाऊजी मोहन पाटील यांनी रीतसर खरेदी केली होती. खरेदी खत झाल्यावर सात बारावर नोंद करण्यासाठी तलाठी सजा उसरोळी यांच्याकडे दिली होती. यावेळी तेथील तलाठी काळे यांनी मंडळ अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. मंडळ अधिकाऱ्यांनी तलाठी व स्वत:साठी पाच पाच हजार रु पये मागितले, त्याप्रमाणे तक्र ारदारांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली होती. ठरलेल्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारच्या दरम्यान हा सापळा रचण्यात आला. मंडळ अधिकारी साहेबराव साबळे यांनी पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. परंतु तलाठी काळे या दिवशी गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर सापळा यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे उसरोळी तलाठी अगदी थोडक्यात बचावल्या आहेत .मजगाव येथील गट नंबर ५०८ ही जमीन मुरुड तहसीलदारांच्या आदेशाप्रमाणे ३२ म ची नोंद करावयाची होती. हरिश्चंद्र कांबळी यांची ती जमीन होती. यावेळी ही नोंद दाखल करण्यासाठी तलाठी नांदगाव संजय शिंगे यांनी सर्कल व तलाठी मिळून असे एकंदर दहा हजार रु पयांची लाच मागितली होती. त्यांनी यशवंत पाटील यांना सांगितले त्याप्रमाणे ही तक्रार सुद्धा यशवंत पाटील यांनी लाचलुचपत विभागाकडे दाखल केली होती. या प्रकरणातील पाच हजार रुपये मंडळ अधिकाऱ्यांनी अगोदरच घेतले होते परंतु याच प्रकरणातील पाच हजार रु पये स्वीकारताना तलाठी संजय शिंगे यांना त्यांच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. (वार्ताहर)