मद्य विक्रेत्यांवर कारवाई करा

By Admin | Updated: April 20, 2017 03:47 IST2017-04-20T03:47:48+5:302017-04-20T03:47:48+5:30

नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टीची दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

Take action on alcohol sellers | मद्य विक्रेत्यांवर कारवाई करा

मद्य विक्रेत्यांवर कारवाई करा

नेरळ : नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टीची दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही ठिकाणी नेरळ पोलिसांनी हातभट्ट्यांवर कारवाई केली आहे. परंतु अनेक गावांमध्ये खुलेआम दारू विक्र ी केली जात आहे. अशा दारू विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नेरळ परिसर दारूमुक्त करावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेने नेरळ पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा अखिल भारतीय मानवाधिकार संघटना उपोषण करेल असा इशारा दिला आहे.
नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टी दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे खुलेआम सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे तरु ण या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मागील चार वर्षांपासून मानवाधिकार संघटनेने या विरोधात सतत आवाज उठवत रायगड पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्क आयुक्त यांच्याकडे अनेकवेळा तक्र ारी केल्या आहेत. परंतु याकडे थातूरमातूर कारवाई केली आहे. अनेक गावांमध्ये सर्रास दारू विक्र ी होत असल्याने त आदिवासी बांधव व काही गावातील तरु ण व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारूच्या अतिसेवनाने तरु ण दगावत आहेत. अनेक ठिकाणी तर कुटुंबाचा आधार असलेल्या तरु णाचा दारूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नेरळ पोलिसांनी नेरळ परिसरातील अनेक गावांमध्ये जाऊन जे कोणी दारू बनवत आहेत व दारूची विक्र ी करत आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार संघटनेने नेरळ पोलीस उपनिरीक्षक आर. एन. तडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
आहे.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण मोर्गे, उप जिल्हा अध्यक्ष गोरख शेप, कर्जत तालुका अध्यक्ष गणेश शेळके, संपर्क प्रमुख संदीप गायकवाड, सचिव महेंद्र मोगरे, सोयब जळगावकर, मयूर कांबरी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Take action on alcohol sellers