शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पालीतील आयटीआय समस्यांच्या भोवऱ्यात; सहा वर्षांत इमारतीची दयनीय अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:02 IST

पालीतील शिळोशी मार्गावरील आयटीआय कॉलेजचे उद्घाटन २७ जानेवारी २०१४ रोजी झाले

- विनोद भोईर पाली : पालीतील शिळोशी मार्गावरील आयटीआय कॉलेजचे उद्घाटन २७ जानेवारी २०१४ रोजी झाले. अवघ्या सहा वर्षांत इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे, त्या वेळी इमारतीवर शेड बसविण्यात आले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पावसाच्या पाण्याने वर्गातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. वीजतंत्री वर्गात वीज विद्युत ट्रान्सफरची मुख्य लाइन खुली असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. वारंवार पाली विद्युत कार्यालयात अर्ज करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने आयटीआय कॉलेजच्या इमारतीची पाहणी करून चार महिने झाले तरी त्याची दुरुस्ती केली नाही.

गेल्या सहा वर्षांपूर्वी आयटीआय कॉलेजचे उद्घाटन झाले, ही इमारत व तिचा परिसर दोन हेक्टर इतका आहे. त्यात अभिलेख कक्ष, वीजतंत्री वर्ग, मल्टीमीडिया अ‍ॅनिमेशन, भंडारा खोली, वर्गखोली, दोन कात्रण व शिवण वर्गखोली, तारतंत्री वर्कशॉप, तारतंत्री वर्गखोली, ग्रंथालय, मोठा वर्कशॉप, असा परिसर आहे. त्यातील मुलींची टेलरिंग व कटिंग वर्ग प्रवेश नसल्याने बंद आहे. सध्या कॉलेजमध्ये ४२ विद्यार्थी शिकत आहेत. २१ वायरमेन व २१ फिटर आहेत. बॅच वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्राचार्य यांनी सांगितले.

शासनाने मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन उत्तम डिग्री घेऊन व्यवसाय व नोकरी करावी, यावर मोठ्या प्रमाणात शासन खर्च करत आहे; परंतु ग्रामीण भागातील कॉलेजकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अडचणींची दखल घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता येईल यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

आयटीआय कॉलेज इमारतीची पाहणी केली आहे, त्याची दुरुस्ती व शेडचे अंदाजपत्रक बनवून सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्याकडे या दोन दिवसांत पाठविणार आहे.- दिलीप मदने, उपअभियंता

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजRaigadरायगड