शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये एसटीनेदेखील घेतली विश्रांती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:01 IST

 प्रवासी संख्या घटली; आगाराच्या लांब पल्ल्यांच्या, ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द

सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्क दासगाव : देशभरात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालल्याने गेले अनेक दिवस नागरिकांना निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याने महाड आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने गाव तिथे धाव घेणाऱ्या एसटीने महाड आगारात विश्रांती घेतली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. याचे लोण आता ग्रामीण भागातदेखील पोहोचले गेले. यामुळे शासनाने सुरुवातीला मिनी लॉकडाऊन करत दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली. मात्र, खासगी प्रवासी वाहने सुरूच असल्याने शहरातील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने यावर मार्ग काढण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले. पुन्हा नवी नियमावली जाहीर केली आहे.

या नवीन नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. त्यातच ग्रामीण भागात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरात येण्यास तयार नाहीत. शिवाय, शहरातील नागरिकांनीदेखील मोठ्या शहरात आणि इतर ठिकाणी जाण्याकडे पाठ फिरवल्याने एसटी प्रवासीसंख्या घटू लागली आहे. लांब पल्ल्यांच्या, ग्रामीण फेऱ्यांना ही घटलेली प्रवासीसंख्या परवडणारी नसल्याने महाड आगाराने अनेक फेऱ्या रद्द केल्या.

दिवसाला ५०० ते ६०० किमीचाच प्रवास एसटीचा दिवसाला किमान ५०० ते ६०० किमीचाच प्रवास होत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नागरिकांसाठी एसटी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. घटलेल्या प्रवासीसंख्येमुळे गतवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील अनेक बसेस महाड आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. दिवसभर घरघर करत फिरणाऱ्या एसटीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विश्रांती घेतली आहे.

रद्द केलेल्या फेऱ्यामहाड एसटी आगाराने महाडमधून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी महाड-बोरिवली, महाड-पनवेल, महाड-ठाणे, तर ग्रामीण भागातील महाड-पोलादपूर, महाड-सापे, महाड-बागलवाडी, महाड-छ. निजामपूर, पोलादपूर-तुटवली या बसेसच्या एकूण ६२ फेऱ्या यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या ७ ते १८ एप्रिलपर्यंत रद्द केल्या होत्या. सध्या महाड-पनवेल, महाड-पुणे आणि मोजक्याच ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत.

मोजक्याच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. एखाद्या फेरीकरिता लागणारे प्रवासी उपलब्ध असल्यास बस सोडण्यात येत आहे.– शिवाजी जाधव, प्रभारी आगारप्रमुख

टॅग्स :state transportएसटी