शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यांवर पाणी फवारणी

By admin | Updated: May 10, 2017 00:22 IST

येथील महात्मा गांधी मार्ग या मुख्य रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्याला स्थानिक वैतागले आहेत. याच रस्त्यावरून पहाटे पाच

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : येथील महात्मा गांधी मार्ग या मुख्य रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्याला स्थानिक वैतागले आहेत. याच रस्त्यावरून पहाटे पाच वाजल्यापासूनच पर्यटकांसह, घोड्यांची रहदारी नियमितपणे असते. पहाटे सफाई कर्मचाऱ्यांमार्फत रस्त्यांवर झाड़ू मारला जातो. परंतु मातीचे रस्ते असल्यामुळे धूळ उडत असते. त्यामुळे मॉर्निंग वॉकला नियमित जाणाऱ्या स्थानिकांना तसेच पर्यटकांना पहाटेच धुळीला सामोरे जावे लागते. यासाठी उपाय म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून मंगळवारपासून महात्मा गांधी मार्गावर सकाळी सात वाजल्यापासून टपालपेटी नाका ते रिगल हॉटेलपर्यंतच्या रहदारीच्या ठिकाणी अग्निशामक गाडीचा उपयोग करून पाणी फवारणीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतलेले आहे.सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदारांच्या सामानावर धुळीचे थरावर थर साठत आहेत. दुकानातील वस्तू जुन्याच वाटत आहेत, तर पर्यटक आणि स्थानिक मंडळींच्या नाका, तोंडात काही ग्रॅम धूळ नियमितपणे जात असल्याने दुर्धर आजार होण्याची संभावना दिसत आहे. दुकानातील जुन्याच वाटणाऱ्या वस्तू पर्यटक घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. या धुळीपायी नाहक आर्थिक भुर्दंड व्यापारी वर्गाला सोसावा लागत आहे. परिणामी याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्यगृहे असल्याने सहसा या खाद्यगृहात शिरण्यास पर्यटक धजावत नाहीत. यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटातील गटनेते प्रसाद सावंत यांनी संबंधित विभागाला दिलेल्या सूचनेनुसार अभियंत्यांनी धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात के ली आहे. यामुळे धूळ कमी होऊन पर्यटकांना होणारा त्रास कमी होणार आहे.त्यासाठी येथील वॉकर टंक (बालदी) येथून पाण्याचा उपसा केला जात आहे. काहीअंशी का होईना यामुळे धुळीचे प्रमाण कमी झालेले दिसत असल्यामुळे व्यापारी वर्गातून नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्र माचे कौतुक होत आहे.