शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राइट टू एज्युकेशन कायदा बासनात? ७० टक्के शाळेत आॅनलाइन शिक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:27 IST

शैक्षणिक वर्ष जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू होते. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी शाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

- आविष्कार देसाईरायगड : कोरोनामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देत असल्याचा दावा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे. सुमारे ७० टक्के शाळांनी याचा अवलंब केला असला, तरी उर्वरित ३० टक्के शाळांमध्ये यावर बंधने येत आहेत. त्यामुळे राइट टू एज्युकेशन कायदा सरकारने बासनात गुंडाळून ठेवला आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनसारखे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार पुन्हा ठप्प झाले आहेत. अनलॉकनंतर अर्थव्यवस्था काही प्रमाणात पूर्वपदावर येत होती. मात्र, कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला आहे. शैक्षणिक वर्ष जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू होते. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी शाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे केला आहे. त्याला काही शाळांनी प्रतिसाद दिला आहे, तर काही शाळांनी नाकारले आहे.रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि खासगी, अनुदानित, विना अनुदानित, तसेच सरकारी शाळांची एकूण संख्या ३,७२२ आहे. या शाळांमध्ये सर्व मिळून तब्बल २० हजार ३१४ शिक्षक आहेत, तर ३ लाख ७५ हजार ८६६ विद्यार्थी संख्या आहे. जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित विना अनुदानित, सरकारी शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७० टक्के शाळांमध्ये अशी सुविधा सुरू असल्याचा दावा शिक्षणाधिकारी बाळासो थोरात यांनी ‘लोकमत’बरोबर बोलताना केला. खासगी आणि सरकारी शाळेतील शिक्षकांना आॅनलाइन शिक्षणाबाबत माहिती आहे, तर काही ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील शाळांमध्ये डिजिटल, आॅनलाइन शिक्षण सुरुवातीला मर्यादित स्वरूपात दिले जायचे. आता मात्र, कोरोनामुळे तोच एकमेव पर्याय सरकारने निवडला असला, तरी कोणावरही आॅनलाइन शिक्षणाची सक्ती करू नये, असेही सरकारने स्पष्ट केल्याने पालकांमध्ये संभ्रम वाढला आहे. ज्यांना शक्य आहे, ते आॅनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, दुसरीकडे सोईसुविधांअभावी आॅनलाइन शिक्षण घेता येत नाही. यातून सरकार समाजामध्ये दुफळी तर निर्माण करत नाही ना, अशी शंका येत असल्याचे ह्युमन रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सरकारच्या या धोरणामुळे राइट टू एज्युकेशनचा अर्थ काय, असा सवालही डॉ.पाटील यांनी केला.आॅनलाइन शिक्षण किती कालावधीसाठी दिले जाणार, याबाबत अनिश्चितता आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होईल, हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे सरकार याबाबत धोरण ठरवत नाही, तोपर्यंत आॅनलाइन शिक्षणाचा गोंधळ असाच सुरू राहणार असल्याचे दिसते.शिक्षण विभागाची आकडेवारी फे कआमच्या शाळेमध्ये आम्ही ऑनलाइन शिक्षण देत नाही. शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्राइड मोबाइल नाहीत, नेटची सुविधा असेलच असे नाही, असे दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील आॅनलाइन शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आकडेवारी फेक आहे, असा आरोपही त्यांनी केला. मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट, लाइट अशा सुविधा आहेत का, याबाबत शिक्षण विभागाने सर्व्हे केला, तेव्हा मोघम आकडा सांगा, असे आम्हाला सांगितले होते, असेही वार्डे यांनी स्पष्ट केले.दुर्गम भागांमध्ये सुविधा नाही : जिल्ह्यात काही दुर्गम भागांमध्ये अद्यापही अँड्रॉइड मोबाइल, टॅब, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा, अंखडित वीजपुरवठा अशा महत्त्वाच्या गोष्टींची वानवा आहे, तसेच काही शाळांनी तर आॅनलाइन शिक्षणामध्ये काहीच तथ्य नाही. सरकार काहीतरी करत आहे, असे दाखविण्याची ही कसरत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील ३० टक्के शाळांनी या सर्व कारणांनी आॅनलाइन शिक्षणाला दूर ठेवल्याचे दिसून येते.शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न : आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शाळांकडून अ‍ॅपवर शिक्षकांचा व्हिडीओ पाठविण्यात येतो. त्यामध्ये शिक्षक इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय शिकवतात, असे पालक अ‍ॅड. रत्नाकर पाटील यांनी सांगितले. आमची मुले किमान अर्धा-एक तास तरी शैक्षणिक ज्ञान घेतात, परंतु शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाEducationशिक्षणRaigadरायगड