शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

Raigad Lanslide: मृतदेहांचा खच, अश्रू आणि आक्रोश; ८५ पैकी ४२ मृतदेह सापडले, ४३ बेपत्ता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 07:49 IST

गुरुवारी दरड पडल्याने तळीयेमधील ८५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली हाेती.

ठळक मुद्दे मृतदेह बाहेर काढताना जाेरदार पावसामुळे अडथळा निर्माण हाेत हाेता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत हाेता. मात्र जेसीबी चिखलात रुतत हाेता. दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात मृतांचा खच, अश्रू आणि आक्राेश पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी बचावकार्याला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. उद्या पुन्हा बचावकार्य हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महाड-तळीये येथील ४२ आणि पाेलादपूर येथील ११ अशा एकूण ५५ नागरिकांचा मृ्त्यू झाला आहे. दाेन्ही दुर्घटनेत २२ जण जखमी झाल्याने त्यांच्यावर स्थानिक आणि एमजीएम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी दरड पडल्याने तळीयेमधील ८५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली हाेती. मृतदेह बाहेर काढताना जाेरदार पावसामुळे अडथळा निर्माण हाेत हाेता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत हाेता. मात्र जेसीबी चिखलात रुतत हाेता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बचावकार्य थांबवण्यात आले हाेते. शनिवारी सकाळी पुन्हा शाेधमाेहीम हाती घेण्यात आली. जाेरदार पावसामुळे आणि दाट धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळा येत हाेता. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ४२ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. 

बेपत्ता ग्रामस्थांच्या शोधासाठी माेहीमदुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या व्यक्ती पाण्याच्या लोंढ्यामुळे कुठे वाहून गेल्या का, यासाठी आजूबाजूच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे.  या दुर्घटनेत सापडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक या परिसरात धाव घेत असल्याने त्यांना माहिती पुरवण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवस्थेसाठी स्थानिक तरूणांनी तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. 

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलनfloodपूर