शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावरील कार्यक्र मांसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: May 10, 2017 00:21 IST

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेले तिन्ही कार्यक्र म कोणत्याही प्रकारचा

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेले तिन्ही कार्यक्र म कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ते नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.रायगडावर ३ आणि ४ जून रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा सुवर्ण सिंहासन संकल्प सोहळा, ५ व ६ जून रोजी तारखेप्रमाणे आणि ६ व ७ जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही कार्यक्र मांसाठी लाखो शिवभक्त गडावर येणार आहेत. गडावरील पाणीटंचाई, शिवभक्तांच्या हजारो वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी त्याचप्रमाणे अन्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विविध शासकीय विभाग आणि या कार्यक्र माच्या आयोजक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक सातपुते यांनी आयोजित केली होती.या तीन कार्यक्र मांमुळे महाड रायगड मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी विचारात घेऊन हा एकदिशा मार्ग करता येऊ शकतो का याची चाचपणी करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. असे झाल्यास महाडकडून रायगडकडे वाहने सोडून त्यांचा परतीचा प्रवास पाचाड निजामपूर मार्गाने होऊ शकतो. गडावरील पाण्याची समस्या विचारात घेऊन प्रत्येक शिवभक्ताने आपल्याबरोबर पुरेसे पाणी बाळगण्याच्या सूचना आयोजक संस्थांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि शिवभक्तांना द्याव्यात असे निर्देशही सातपुते यांनी दिले.या कालावधीत रोपवेचा वापर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला, लहान मुले अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यक्र मांसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी , कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. गडावर मंडप, विजेची रोषणाई, ध्वनी व्यवस्था, मेघडंबरी वगळता अन्य ठिकाणी फुलांची सजावट करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. या सात दिवसांच्या काळात गडावर औषधांसह आरोग्य व्यवस्था आणि गडाच्या पायथ्याशी रु ग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे .या कालावधीत वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, त्याचप्रमाणे गड आणि परिसरात असलेल्या मद्यपान बंदीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन देखील सातपुते यांनी केले आहे.