शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

२८ धरणांत ३१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 29, 2017 01:51 IST

रायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून

जयंत धुळप / अलिबागरायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून शुक्रवारी उपलब्ध माहितीनुसार या २८ धरणांमध्ये केवळ ३१ टक्के म्हणजे २१.१७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. येत्या ५ जून रोजी ऋतूचक्रानुसार मान्सून पावसाचे आगमन झाले तर संपूर्ण मे महिन्यात जिल्हावासीयांची तहान भागविण्यात हा शिल्लक जलसाठा असमर्थ ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जिल्ह्यातील या २८ धरणांपैकी पेण तालुक्यातील आंबेघर धरणात केवळ दोन टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर खालापूर तालुक्यातील भिलवले धरणात १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ११ ते २० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ५ धरणे, २१ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे,३१ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे, ४१ ते ५० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३ धरणे,५१ ते ६० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३धरणे, तर ६१ ते ७० टक्के जलसाठा शिल्लक असलेले पाभरे(म्हसळा) हे एक धरण जिल्ह्यात आहे.जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ सद्यस्थितीत २० टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी येत्या मे महिन्यात अधिक तीव्र होणाऱ्या उन्हाळ््यात टँकर्सची संख्या दुपटीपेक्षा अधिक करावी लागेल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टँकरकरिता पाणी नेमके कुठून उपलब्ध करायचे असाही एक सुप्त प्रश्न आहे.राष्ट्रीय जलनितीनुसार पिण्याच्या पाण्यास प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर शेती व औद्योगिकीकरणास पाणी असा क्रम असल्याने, औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने व्यवस्थापनांच्या पोटातदेखील यंदा या पाणीटंचाईमुळे गोळा आला आहे. पिण्याकरिता पाणी अपुरे पडू लागले, तर औद्योगिक कारखान्यांच्या पाण्यात कपात करण्याचे सूत्र स्वीकारले जाते, त्याचा परिणाम औद्योगिक कारखाने बंद करणे वा त्यांचे उत्पादन कमी करणे असा होत असल्याने औद्योगिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.