शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चवदार तळ्यासाठी एक कोटी

By admin | Updated: April 14, 2017 03:12 IST

ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी

महाड : ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी व नगरपरिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी असा दोन कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी महाडमध्ये दिली. मात्र हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आल्याचा आदेश शासनाने काढल्याने हा मंजूर निधी महाड नगरपरिषदेकडे वर्ग करावा अशी आग्रही मागणी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी बडोले यांच्याकडे केली.या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आ. भरत गोगावले, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, तहसीलदार औदुंबर पाटील, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सातपुते, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगरअभियंता शशिकांत डिगे, सुधीर म्हात्रे, बार्टीच्या संचालिका सविता काळे-जगदाळे आदी उपस्थित होते. ज्या वास्तूचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्या वास्तू नगरपरिषदेच्या मालकीच्या असल्याने नगरपरिषदेची ही मागणी रास्त आहे. मात्र याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही बडोले यांनी स्पष्ट केले.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन वर्षापूर्वी रस्त्याचे काम नगरपरिषदेने करून घेतले मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने तसेच ही कामे करण्यास नगरपरिषद प्रशासन सक्षम आहे. त्यामुळे शासनाने हा निधी नगरपरिषदेकडेच वर्ग करावा, शहरवासीयांच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प नगरपरिषदेने यशस्वीपणे पूर्ण केल्याचेही नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी सांगून त्यांनी नगरपरिषदेची भूमिका यावेळी स्पष्ट केली.(वार्ताहर) महाडमध्ये बैठकचवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी व नगरपरिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी असा दोन कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे मंजूर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आ. गोगावले, नगराध्यक्ष स्नेहल जगताप आदी उपस्थित होते.त्या वास्तू नगरपरिषदेच्या मालकीच्या असल्याने ही मागणी रास्त आहे. मात्र याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल असे बडोले यांनी स्पष्ट केले.