शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ ग्रामपंचायतीचे ५६ लाखांचे वीजबिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:20 IST

वीजजोडणी तोडणार; गतवर्षापासूनचे बिल थकीत; पाणीपुरवठाही होणार बंद

- कांता हाबळेनेरळ : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची महावितरणच्या वीजबिलापोटी तब्बल ५६ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नेरळ ग्रामपंचायतीची वीजजोडणी तोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा आणि गावातील पथदिवे यांची वीज कापली जाण्याची शक्यता आहे.नेरळ ग्रामपंचायतीचे वीजबिल तब्बल ५६ लाखांवर पोहोचले आहे. महिन्याला साधारण सहा लाखांचे वीजबिल नेरळ ग्रामपंचायतीला आकारण्यात येते. त्यात सार्वजनिक वीज ही पथदिवे आणि नळपाणी योजनेसाठी येणारे वीजबिल हे साधारण सहा लाखांवर जाते. फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिल थकीत आहे. ग्रामपंचायतीचे मागील सदस्य मंडळ आणि डिसेंबर २०१९ मध्ये सत्तेवर आलेले सदस्य मंडळ अशा दोघांच्या कार्यकाळात झालेली वीजबिल थकबाकी आहे. त्यात नवीन सदस्य मंडळांच्या काळातील दोन महिन्यांचे १२ लाखांचे वीजबिल थकीत आहे.थकबाकी भरली जावी, यासाठी महावितरण कंपनीकडून सातत्याने नेरळ ग्रामपंचायतीकडे तगादा लावला जात आहे; परंतु ग्रामपंचायतीकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची वीजजोडणी तोडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नेरळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना बंद होऊ शकते, त्याच वेळी पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित झाल्यास रस्तेही अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीतील नागरिकांवर वीज, पाणी आदी मूलभूत गरजांपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही.फेब्रुवारीपासून २०१९ पासून नेरळ ग्रामपंचायतीची वीजबिले थकीत आहेत. महावितरणने या प्रकरणी अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने महावितरण ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या विचारात आहे.