शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मोरझोत धबधबा पर्यटकांचे आकर्षण

By admin | Updated: July 27, 2015 23:34 IST

पावसाळा सुरु झाला की, मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्व शहरवासीयांचे सुटीमधील फिरण्याचे ठिकाण म्हणजे कोकण. येथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून येथील सौंदर्य

पोलादपूर : पावसाळा सुरु झाला की, मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्व शहरवासीयांचे सुटीमधील फिरण्याचे ठिकाण म्हणजे कोकण. येथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून येथील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. कोकणच्या डोंगर दऱ्या पावसाळ्यात काश्मीर खोऱ्याची आठवण करुन देतात. हे निसर्ग सांैदर्य अनुभवण्यासाठी, चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची धबधब्याच्या ठिकाणी गर्दी होत आहे.पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यात असंख्य धबधबे निर्माण होतात. मात्र आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो उमरठ जवळील मोरझोत धबधबा. उमरठ जवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा जवळजवळ २०० ते २५० फुटावरुन कोसळतो. या कड्या कपाऱ्यात निर्माण झालेली नैसर्गिक गुहा व आजूबाजूचा हिरवागार परिसर एका वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातो. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन येथे येणारा प्रत्येक पर्यटक नंतरच मोरझोतकडे जातो. वरुन एकसंध येणारा मोरझोतचा हा जलप्रवाह जमिनीवर पडताच मोर आपला पिसारा फुलवून थुई - थुई नाचत असल्याचा भास निर्माण करतो.या धबधब्यावर महाड - पोलादपूर तालुक्यासह मुंबई - पुणे येथील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. जसाजसा पावसाचा जोर वाढतो तसातसा हा धबधबा आपला आकार वाढवतो. कधी कोवळ्या उन्हात येथे इंद्रधनुष्याचे सप्तरंग पर्यटकांना दर्शन देऊन जाते.या धबधब्यापर्यंत गाडी जात असल्याने पर्यटक जास्त संख्येने येथे येत असतात. मोरझोत धबधब्याजवळ मोठे दगड तसेच तीव्र उतार असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. या धबधब्याजवळच असणारी गुहा पाच - पन्नास माणसे सहज बसू शकतील एवढी मोठी आहे. हे पर्यटनस्थळ विकसित करणे आवश्यक असून येथे फूटपाथ होणे गरजेचे आहे.ही भूमी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असल्याने पर्यटकांनी येथे कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता मद्यपान टाळावे, अशी सर्व नरवीरप्रेमींची इच्छा आहे. (वार्ताहर)उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन येथे येणारा प्रत्येक पर्यटक नंतरच मोरझोतकडे जातो. उमरठजवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा सुमारे २०० ते २५० फुटावरुन कोसळतो. मोरझोत धबधब्यापर्यंत गाडी जात असल्याने पर्यटक जास्त संख्येने येथे येत असतात. या धबधब्याजवळ मोठे दगड तसेच तीव्र उतार असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. येथील गुहेत पाच - पन्नास माणसे सहज बसू शकतील एवढी मोठी आहे.