शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

By admin | Updated: September 22, 2015 03:47 IST

परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्वलंत विषयावर देखावे उभारले आहेत. या व्यतिरिक्त धार्मिक, ऐतिहासिक व चालुघडामोडींवर भाष्य करणारे देखावे तयार करण्यात आले

पनवेल : परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्वलंत विषयावर देखावे उभारले आहेत. या व्यतिरिक्त धार्मिक, ऐतिहासिक व चालुघडामोडींवर भाष्य करणारे देखावे तयार करण्यात आले आहेत. ते पाहण्याकरीता भाविक मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत. यंदा जवळपास दोनशेपेक्षा जास्त लहान मोठया मंडळांनी आकर्षक मंडप तयार करून त्या ठिकाणी नवनवीन संकल्पना देखाव्याच्या रूपाने साकारल्या आहेत. धार्मिक सांस्कृतिक विषयांबरोबरच ज्वलंत सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकीत यामाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आपला गणेशोत्सव शिस्तबध्द असावा याकरीता मंडळा मंडळांमध्ये स्पर्धा लागली आहे.पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या जास्त आहे . पनवेल शहरात आजही अनेक जुन्या मंडळांनी उत्सव परंपरा जपली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही नवीन पनवेल, खांदा वसाहत परिसरात सार्वजनिक गणशोत्सवाच्या ठिकाणी देखावे उभारले आहेत. याकरीता खास कलाकार, वास्तुविशारदांची मदत घेण्यात आली आहे. विशेषत: गणेशभक्तांना आकर्षीत करण्यासाठी चलचित्रांचे देखावे उभारण्यात आले आहेत. पनवेलमधील सन्मीत्र मंडळाकडून महिलांवरील अत्याचार, छेडछाड या ज्वलंत विषयावर देखावा उभारला आहे. यामध्ये मुलींची कशा प्रकारे छडछाड केली जाते याचे चित्रण करुन याबाबत जागृगता निमाण करण्याचा प्रयत्न केला आहे. टपाल नाका येथील शिनमंदीरात मोगलीचा देखावा चलचित्राच्या माध्यमातून तयार केला आहे. विद्याथ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे, पालकांचा दबाव, मोबाईलमध्ये दंग असलेले तरूण पिढी अशा सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर मुलांसंदर्भात विविध विषयांना हात घालण्यात आला आहे. (वार्ताहर)