शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या शेतजमिनी परत द्या!

By admin | Updated: July 27, 2015 03:04 IST

नगरपालिका हद्दीतील अगदी कर्जत शहराला लागून असलेली सुमारे सोळा एकर शेतजमीन शेतपिकाचे विविध प्रयोग करण्यासाठी साठ

कर्जत : नगरपालिका हद्दीतील अगदी कर्जत शहराला लागून असलेली सुमारे सोळा एकर शेतजमीन शेतपिकाचे विविध प्रयोग करण्यासाठी साठ वर्षांपूर्वी शासनाने सुरुवातीला भाडे तत्त्वावर आणि नंतर शेतकऱ्यांची संमती नसताना अत्यंत अल्प दरात घेतली आणि आता या जागेवर शासकीय कार्यालये उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. असे होत असेल तर त्या जागा आम्हा शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशी मागणी मूळ शेतकऱ्यांनी महसूल मंत्री, कृषी मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. १९५५ मध्ये कर्जत नगरपालिका हद्दीतील मुद्रे गावातील शेतकऱ्यांची १५ एकर ३० गुंठे शेतजमीन शासनाने भाडे तत्त्वावर घेतली आणि तेथे कोकण कृषी विद्यापीठाने प्रादेशिक कृषी केंद्र सुरु केले. उल्हास नदीवर मातीचा बंधारा बांधून तेथून या शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे प्रयोग सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे भात पैदास केंद्र म्हणून ते प्रसिद्धीला आले. १९५५ ते १९८० पर्यंत शेतकऱ्यांना एकरी मक्ता दिला गेला मात्र त्यानंतर १९८१ ला शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची संमती न घेता प्रति गुंठा केवळ २४५ रु पये म्हणजे एकरी नऊ हजार आठशे रु पये देऊन ही जागा ताब्यात घेतली त्यावेळी जमिनीचा दर कितीतरी पट होता. याबाबत तत्कालीन कुलाबा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार अर्ज केले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता या जागेवर शासकीय कार्यालये, सांस्कृतिक केंद्र आदी उभारण्याचा प्रयत्नही वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. विशेष म्हणजे या जागेवर शेतीचे विविध प्रयोग सुरु असताना नगरपालिकेने शासकीय कार्यालयांसाठी आरक्षण सुद्धा टाकले आहे. असे असेल तर ज्या हेतूसाठी आमच्या जमिनी घेतल्या आहेत तो हेतू बाजूला करून अन्य वापरासाठी या जमिनीचा उपयोग करण्यात येणार असेल तर आमच्या शेतजमिनी आम्हाला परत द्याव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे. सध्या ज्या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे प्रयोग होत आहेत त्यासाठी उन्हाळ्यात पाणी नसल्याने कितीतरी वेळा प्रयोग वाया गेले आहेत. शासनाने राजनाला विभागात प्रादेशिक कृषी केंद्राला जागा द्यावी म्हणजे बारमाही शेतीसाठी पाणी मिळेल व शेतीचे प्रयोग यशस्वी होतील. आम्हाला आमच्या शेतजमिनी परत द्या, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाने दिला आहे. (वार्ताहर)