शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जीवनातील संघर्षासाठी नेतृत्व विकास आवश्यक

By admin | Updated: May 9, 2017 01:28 IST

वंचित समाजातील मुलांना शिक्षणासाठी व जगण्यासाठी बहुतांशी परिस्थिती प्रतिकूल असते. या परिस्थितीवर मात करत ही

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वंचित समाजातील मुलांना शिक्षणासाठी व जगण्यासाठी बहुतांशी परिस्थिती प्रतिकूल असते. या परिस्थितीवर मात करत ही मुले औपचारिक शिक्षणच नाही तर जीवन जगण्यासाठी शिक्षण घेतात. आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेम, स्वास्थ्य व जिव्हाळ्याबरोबरच मूलभूत हक्कही महत्त्वाची भूमिका बजावतो. जीवनाच्या संघर्षाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी व नेतृत्व गुण विकास करण्यासाठी उन्हाळी शिबिर आयुष्यात महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केले आहे.पेण तालुक्यातील सावरसई येथे अंकुर ट्रस्ट व चाईल्ड हेवन या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी व निराश्रित मुला-मुलींच्या नेतृत्व गुण विकास शिबिराच्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होत्या. यावेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभिनयाच्या राज्य प्रमुख डॉ. अस्मिता पाटील, कामगार चळवळीतील कार्यकर्त्या अ‍ॅड. चित्रा भानुदास, नितीन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.आठ दिवस मोफत निवासी शिबिरात चाईल्ड हेवन संस्थेतील ६२ कुमारवयीन मुले-मुली सहभागी झाल्या होत्या. शिबिरात राष्ट्र सेवा दलाचे यशवंत भिडे, देविदास पाटील यांच्याबरोबरच सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी मुलांशी संवाद साधून बौद्धिक घेतले. मुंबईच्या प्रेरणा या संस्थेचे कार्यकर्ते पंकज गुरव व आभा धुळप यांनी खेळ, नाटक व गाण्यांद्वारे मुलांना सामाजिक प्रश्नांची जाण करून दिली. निसर्ग हास्य क्लबद्वारे दररोज योग व प्राणायाम शिकविण्यात आले. आपले मनोगत मांडताना चाईल्ड हेवन संस्थेतील योगेश हिवाळे या मुलाने मुलांमध्ये गटचर्चा घडवून आणून आपल्या नेतृत्व गुणाची आगळी झलक समारोप समारंभात उपस्थितांना दाखवून दिली, तर मुलांनी समूहगान सादर केले. शिबिराचे व्यवस्थापन प्रकाश पाटील यांनी तर सूत्रसंचालन जितेश शिरसाट यांनी केले. संजय नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.