शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनास दहा वर्षे झाली, तरी वीट लागेना; नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:58 IST

सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाने २००८ मध्ये ३० लाखांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

- विनोद भोईर पाली : सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाने २००८ मध्ये ३० लाखांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २००८ पासून २०१८ पर्यंतच्या कालावधीत तीन वेळा नारळ फोडण्याचा समारंभही उरकून घेण्यात आला. अखेर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी भूमिपूजन केले असता त्या प्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी डॉक्टर सावंत यांना या ग्रामीण रुग्णालयाचे तिसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे. मात्र, ही वास्तू तुमच्या कारकिर्दीत पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर डॉक्टर सावंत यांनी बल्लाळेश्वर पावन भूमीतील या वास्तूचे काम पूर्ण करण्याची संधी मला दिली आहे. ते मी पूर्ण करणार, असा विश्वास दिला होता. मात्र, त्यांनीही याकडे आजवर लक्ष दिले नाही.

शासनाने निर्णय घेऊन तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली तरी ग्रामीण रुग्णालय झाले नसल्याने सुधागडातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या ग्रामीण रुग्णालयाचे तीन वेळा भूमिपूजन केले तरी आजवर वीट लागली नाही. तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत गरज आहे; कारण औद्योगिकीकरण हे मोठ्या प्रमाणात झाले असून, त्यांच्या तुलनेत हे प्राथमिक आरोग्य केंद्र कुचकामी ठरत आहे.

आरोग्य केंद्राची झाली दयनीय अवस्था

१सध्या या केंद्राची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शासन नियमाप्रमाणे पूर्ण वेळ दोन डॉक्टर अपेक्षित असताना एकच डॉक्टर कार्यरत आहे. आॅपरेशन थिएटर पूर्णपणे मोडकळीस आले आहे. आता त्याची अवस्था गोडाऊनसारखी झाली आहे.

२पावसाळ्यात ही इमारत जागोजागी गळत असते, कधीतरी रंगरंगोटी करून इमारत देखणी झाल्याचा आभास निर्माण केला जातो. कर्मचाऱ्यांना ही इमारत गैरसोयींची वाटू लागली आहे.

सुधागड तालुका हा आदिवासी तालुका आहे. येथे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात नाही. येथे मोलमजुरी करूनच लोक आपला उदरनिर्वाह करतात. येथील जिल्हा परिषद दवाखान्यात नेहमीच औषधांचा तुटवडा भासतो. मोठा आजार असल्यास किंवा अपघात झाल्यास मुंबई येथे रुग्णास हलवावे लागते. ही खर्चिक बाब असून ती न परवडणारी आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे.- रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते.

पाली ग्रामीण रुग्णालयाचे २२ कोटी ४९ लाख १६ हजार ७०० रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.- डॉ. अजित गवळी, जिल्हा सहायक चिकित्सक

टॅग्स :Raigadरायगड