शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेकरूंच्या संख्येत वाढ

By admin | Updated: April 13, 2017 02:50 IST

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढली असून ही एक समाधानकारक बाब आहे. भीमाशंकर अभयारण्यापाठोपाठ आता फणसाड

- संजय करडे, नांदगाव/मुरुडमुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढली असून ही एक समाधानकारक बाब आहे. भीमाशंकर अभयारण्यापाठोपाठ आता फणसाड अभयारण्यसुद्धा शेकरूंसाठी प्रसिद्ध होणार आहे. शेकरू म्हणजेच खारु ताईपेक्षा मोठ्या आकाराने असणारा प्राणी. फणसाड अभयारण्य हे ५३०० हेक्टर परिक्षेत्रात व्याप्त परिसर असून, रोहा व मुरुड तालुक्यांत याची व्याप्ती आहे. सुरुवातीच्या काळात या अरण्यात शेकरूंची संख्या अगदी मोजकीच म्हणजेच २५ एवढी होती; परंतु ती आता १५०वर गेली असून हा प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरत असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली.या अभयारण्यात शेकरूंची ८०० घरटी दिसून आली असून एक शेकरू स्वत:ला राहण्यासाठी किमान पाच ते सहा घरटी बनवत असतो. हा प्राणी उंच अशा झाडावर राहत असून हा फार भीत्रा, तसेच लाजाळू प्राणी आहे. चिखलगान भागात शेकरूंची संख्या जास्त असून येथे पर्यटक नेहमी गर्दी करून दुर्बीणीच्या साहय्याने न्याहाळतात. शेकरूंचे आवडते खाद्य हे गारंबीच्या शेंगातील आतला गर असून, फळे, कोवळा पाला, जांभूळ हे आहे. फणसाड अभयारण्यात शेकरूंचे जतन व संवर्धन यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती यावेळी तडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. फणसाडमध्ये बिबट्यांची संख्या १३ आहे; परंतु यातील काही माद्यांनी पिल्ले घातली असून यातसुद्धा वृद्धी झाल्याचे तडवी यांनी सांगितले. तसेच सांबर, हरीण, भेकर, पिसोरी, रानमांजर, खवले मांजर, लंगूर माकडे आदी प्रजाती असल्याचे सांगितले. फणसाड अभयारण्याला पाणीटंचाई भासत नाही, कारण पाण्याचे नैसर्गिक २७ स्रोत आहेत. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांना पाणी सतत मिळते. मे अखेरपर्यंतही पाणी असल्याने पाण्याची टंचाई भासत नाही. शिकारीचे प्रमाण या भागात शून्य टक्क्यांवर असून कायदा कडक झाल्याने हा परिणाम झाल्याचे या वेळी वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले. कारण शिकार करताना कोणताही व्यक्ती अथवा वाहन सापडल्यास न्यायालयाकडून जामीन मिळत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना बरेच दिवस तुरुं गात खितपत पडावे लागते. शिकारीचे प्रमाण शून्य असल्याचा निर्वाळा या वेळी त्यांनी दिला.फणसाड अभयारण्यात १७ गिधाडांचे वास्तव्य असून प्रत्येक ग्रामपंचायतीस कार्यालयामार्फत मृत जनावर असल्याची माहिती देऊन हे जनावर गिधाडांसाठी घेतले जाते. डॉक्टर तपासणी केल्यावर मगच हे गिधाडांना खाद्य दिले जाते. कडक उन्हाचा गिधाडांवर कोणताही परिणाम होत नाही फक्त त्यांना खाद्य मोठ्या प्रमाणावर लागत आहे. सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असून फणसाडला नेहमीच गर्दी पाहावयास मिळत असून तिकिटाच्या रूपाने महसूलसुद्धा वनखात्याचा वाढत आहे.