शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हिमालयातील ग्रिफोन गिधाडांचा कोकणात वावर; वन्यजीव अभ्यासकांची श्रीवर्धन तालुक्यात केली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:24 IST

कोकणामध्ये हिमालयातील या गिधांडांची नोंद हा फार दुर्मीळ योग आहे.

माणगाव : हिमालयातील उच्च प्रदेशात आढळून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफोन गिधाडांची नोंद २६ जानेवारी २०२० रोजी माणगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे केली आहे. हिमालयात आढळून येणारे सर्वात मोठे आणि वजनदार गिधाड म्हणून आकाराने प्रचंड असलेल्या हिमालयीन गिधाडांची ओळख माळढोक पक्ष्यानंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा पक्षी अशी आहे.कोकणामध्ये हिमालयातील या गिधांडांची नोंद हा फार दुर्मीळ योग आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दशकात गिधाडांचे संवर्धन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे अलीकडेच लुप्त होत चाललेल्या पांढरपाठी गिधाड आणि भारतीय गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, त्यामुळे रायगडमध्ये गिधाडांसाठी चांगले पोषक वातावरण असल्याने बाहेरून इतर गिधाडांच्या प्रजातीदेखील येथे दाखल झालेल्या पाहावयास मिळत असल्याचे शंतनू कुवेसकर यांनी सांगितले आहे.आपल्या पर्यावरणात गिधाडे नैसर्गिक सफाई कर्मचारी म्हणून फार मोठी व महत्त्वाची भूमिका बजावत असतात. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये वनखात्याने राबविलेल्या गिधाड संवर्धन योजनांना या आधीच चांगले यश मिळाले आहे. हिमालयातील ग्रिफोन गिधाडांची कोकणातील या पट्ट्यामध्ये नोंद म्हणजे फार दुर्मीळ योग असून, पर्यावरण अभ्यासकांमध्ये मोठा कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.श्रीवर्धनमध्ये सात गिधाडे- पांढरपाठी आणि भारतीय गिधाडांसोबत एकूण सात हिमालय गिधाडे श्रीवर्धन येथे दिसून आली आहेत. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांपैकी मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये या गिधाड प्रजातीचे मुख्य वास्तव्य आहे, थंडीच्या मोसमात उत्तर भारतातील काही पट्ट्यात ही गिधाडे दाखल होतात.

टॅग्स :Raigadरायगड