शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना धास्ती, विद्यार्थी गैरहजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:54 IST

शाळा सुरू. मात्र विद्यार्थीसंख्या कमी; अटी-शर्तींस पालकांचा नकार

मोहोपाडा : राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा सोमवारी सुरू झाल्या. मात्र विद्यार्थीसंख्या कमी आहे. पालक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. मात्र, रिलायन्स फाउंडेशनची धीरूभाई अंबानी, सेंट जोसेफ, प्रिया, पिल्ले या शाळा बंद असून त्यांच्या अटी-शर्तींस पालकांचा नकार आहे.राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत जरी निर्देश दिले असले तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत असे आजचे चित्र होते. खालापूर तालुक्यातील ४७ शाळांपैकी जेमतेम १० शाळा सुरू झाल्या असून १६२ विद्यार्थी हजर होते. त्यांनाही लवकर सोडण्यात आले. ज्या खासगी शाळा आहेत, त्यांच्या व्यवस्थापणाने घातलेल्या अटी व शर्तींस पालकांनी मान्यता न दिल्याने शाळेचे गेट बंद आहेत. विद्यार्थ्यांची सर्वच जबाबदारी पालकांनी घेऊन शाळेत आणण्यापासून ते घरी जाईपर्यंत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे ही अट आहे. त्यामुळेच ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, अशी मागणी पालकांची आहे.

पालकांकडून अद्यापही शाळेला संमतीपत्रे नाहीत

चौक येथील सरनोबत नेताजी पालकर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या ६०० पैकी ८५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले येथे ७ व विद्यामंदिर सारंग येथे १८ विद्यार्थी हजर होते. यांच्या पालकांकडून अद्यापही शाळेला संमती मिळाली नाही, तर संमती पत्र नसल्याने विद्यार्थ्यांना परत पाठविले आहे. 

वरील तिन्ही शाळेंतील शिक्षक व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात एक शिक्षक पॉझिटिव्ह व दोन शिक्षक यांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नाहीत. तिन्ही शाळांनी शाळा व परिसर स्वच्छ ठेवला असून सॅनिटाईज करण्यात आले आहे. ऑक्सिमीटर व थर्मल मशीनद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

 

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळा