शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दिवेआगरला दहा हजार पर्यटकांनी दिली भेट, व्यावसायिक सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 12:59 AM

५०० निवास बुकिग फुल;  आठ महिन्यांनंतर समुद्रकिनारे गजबजले, दिवाळीनंतर पहिल्यांदाच मोठी गर्दी

गणेश प्रभाळेदिघी : प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच. मात्र, आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या पर्यटनाला या विकेंडला शनिवारपासून पहिल्या दिवशी जवळपास १० हजार पर्यटकांनी दिवेआगरला भेट दिली जी आजवरची सर्वांत उच्चांकी संख्या ठरत आहे

श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. विशेषतः येथील समुद्रकिनारे सुरक्षेच्या दृष्टीने नावाजलेले आहेत. पर्यटनाच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रसिद्ध असणारे दिवेआगर येथे येण्याची पर्यटकाला उत्सुकता असते. मात्र, दिवाळीनंतर या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. कोरोनामुळे विविध कारणांसाठी लांबलेल्या पर्यटकांची या वेळी हाऊसफुल गर्दी झाल्याने ५००च्या जवळपास मोठ्या हॉटेल्ससह स्थानिक घरघुती निवास बुकिंग फुल झाल्याची माहिती मिळत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारी जवळ असलेले श्री रूपनारायण मंदिर हेदेखील दर्शनीय आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. येणारे पर्यटक आपले कुटुंबीय तसेच मित्रपरिवारासह पाण्यात मनसोक्‍त डुंबण्याची मजाही बिनधास्तपणे लुटताना दिसतात. या विकेंडला सायंकाळच्या वेळी येथील किनारा गर्दीने फुलून गेलेला आहे. जवळपास १० हजारांहून अधिक पर्यटक येथे भेट देत असल्याचे कळाले. पर्यटकांच्या रेलचेलीने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

पर्यटनाला अनपेक्षित प्रतिसाददिवेआगर पर्यटनाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली असली तरी दिवाळी हंगामात पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. यापुढे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची ही रेलचेल नववर्षाच्या स्वागतासाठी अशीच कायम राहणार आहे. दिवाळीनंतर पर्यटकांमध्ये वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट्सदेखील सुरू करता आले, असे काही व्यवसायिकांनी सांगितले. 

टॅग्स :tourismपर्यटन