शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:38 IST

मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : एप्रिल, मे महिना चालू झाला की शेतकरी आपली शेतीची कामे उरकती घेत असतो. यावेळी लागणारा लाकूडफाटा, वैरण, आदी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जमा करण्यात शेतकरी मजूर मश्गुल असतानाच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या अगोदर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी घरांची कौले, पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. परसुळे येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जमीनदोस्त होऊन पत्रे व इतर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच किचन शेड, शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, ध्वजस्तंभ व हँडवॉश स्टँड याचेही पूर्ण नुकसान झाले आहे. यानंतर सर्व ग्रामस्थ व मुख्याध्यापक कळंबे तसेच ग्रामसेवक करमत यांनी तातडीने येऊन पत्रे उडालेल्या खोलीमधून सर्व साहित्य इतरत्र हलविले. त्याचप्रमाणे गावातील जितेंद्र जाधव यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत.अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तसेच वादळी वाऱ्याने नुकत्याच आलेला आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आंबा जमिनीवर कोसळला. शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नपोलादपूर तालुक्यातील ढवळे भागात सोमवारी तसेच मंगळवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. कशेडीसह इतर विभागात वाऱ्याचा तडाखा बसल्याने आंबे गळून पडले आहेत. त्यातच जनावरांचा चारा भिजल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ढवली, कामथी, सावित्री विभाग, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्याच्या आंबा बागायतीला पावसाचा फटका बसला आहे.

 

टॅग्स :Raigadरायगड